पृथ्वी फाउंडेशनतर्फे आठ महिलांचा पैठणी देऊन सन्मान; उद्योजकता व आरोग्याबाबत मार्गदर्शन

 *पृथ्वी फाउंडेशनतर्फे आठ महिलांचा पैठणी देऊन सन्मान; उद्योजकता व आरोग्याबाबत मार्गदर्शन* 




 *_चहा त्याग करणाऱ्या महिलांचा गौरव • कवितेने उपस्थितांना भावूक केले • तंबाखू सोडण्याची घेतली शपथ_* 


📍 पारोडी (ता. आष्टी, जि. बीड) प्रतिनिधी:


पृथ्वी फाउंडेशन, महाराष्ट्र च्या वतीने “प्रेरणा, परिवर्तन आणि प्रगती” या महिला सन्मान व उद्योजकता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चहा त्याग करून आरोग्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकणाऱ्या आठ महिलांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.


सन्मानित महिलांमध्ये

सौ. सारिका सायंबर, सौ. ज्योती सायंबर, सौ. स्मिता सायंबर, ग. भा. रंजना सायंबर, ग. भा. सुबाबाई सायंबर, सौ. ज्योती परकाळे, सौ. उषा सायंबर, सौ. नंदा सायंबर

यांचा समावेश होता.


कार्यक्रमात उद्योजक अशोक धायगुडे यांनी “उद्योग कसा उभारावा” या विषयावर मार्गदर्शन करताना नियोजन, सातत्य, मेहनत आणि योग्य निर्णय या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी ग्रामीण भागातील युवक-युवतींनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन केले.


यावेळी कवी व पत्रकार डॉ. सूर्यकांत वरकड यांनी आईवरील हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांना भावूक केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वी फाउंडेशनचे खजिनदार दादा घोडके यांनी केले. अध्यक्ष प्रा. अमोल जालिंदर सायंबर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पृथ्वी फाउंडेशन हे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजसेवा या चार घटकांवर कार्य करत असून महिलांनी चहा सोडणे हे आरोग्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.


या कार्यक्रमात आदर्श शिक्षक अण्णासाहेब घोडके यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत शिक्षण व आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच युवा उद्योजक शहाजी कर्पे, बाळासाहेब झांबरे, भाऊसाहेब घोडके (उपसरपंच देवळा), रवी मुटकुळे, ज्ञानदेव मिसाळ, रामदास बांडकर, आकाश गांगर्डे, जालिंदर सायंबर,  कृष्णा सायंबर यांची उपस्थिती होती.


यावेळी नवनिर्वाचित पोलीस पाटील भीमराज मिसाळ व सीमा रोहिदास घालमे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश परकाळे यांनी केले तर अध्यक्षस्थान बंकट परकाळे यांनी भूषविले.


अध्यक्षीय भाषणात बंकट परकाळे व गोकुळ काळे यांनी कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन तंबाखू सोडण्याचा संकल्प जाहीर केला.



 *या कार्यक्रमातून आरोग्य, उद्योजकता आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.* 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.