भारतीय जनता पार्टीच्या आष्टी विधानसभा प्रमुखपदी गणेश शिंदे यांची निवड

 भारतीय जनता पार्टीच्या आष्टी विधानसभा प्रमुखपदी गणेश शिंदे यांची निवड



आष्टी (प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षाच्या आष्टी विधानसभा प्रमुखपदी गणेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या साधेपणा, प्रभावी जनसंपर्क आणि कामाबद्दलच्या निष्ठेमुळे पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर विश्वास बसला असून ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पक्षाच्या मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी सुरू असलेल्या ‘एस.आय.आर.’ अभियानांतर्गत बी.एल.ए. वन (BLA-1) म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे महत्त्वाचे काम ते पार पाडणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा उपयोग पक्ष संघटन बळकट करण्यासाठी होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून पुढे आलेल्या शिंदे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना गणेश शिंदे यांनी, “पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्य ओळखून तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना अधिक सक्षम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन,” असा निर्धार व्यक्त केला.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

गणेश शिंदे यांच्या या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.