*बलभीम शिंदे सर एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व - भीमराव धोंडे*
कडा: अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मोतीलाल कोठारी विद्यालयातून 1996 साली निवृत्त झालेल्या श्री बलभीम दशरथ शिंदे यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेल्या इंग्लिश ए टू झेड या पुस्तकाचे प्रकाशन अंबिका लॉन्स येथे करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री भीमराव धोंडे साहेबांनी शिंदे सर माझ्यासाठी ऋषीतुल्यआहेत असे उदगार काढले. यावेळी मंचावर प्रकाशन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष श्री किशोर हंबर्डे, श्री गोकुळदास मेहेर, श्री. यश आजबे, श्री. राधेश्याम धस उपस्थित होते.
मोतीलाल कोठारी विद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने अंबिका लॉन्स येथे पुस्तक प्रकाशन आणि वाढदिवस अभिष्टचिंतन असा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री शिवाजी केकाण, पुणे येथील आर टी ओ इन्स्पेक्टर श्री अविनाश दळवी, पासपोर्ट ऑफिसर श्री भीमराव कुऱ्हाडे, कॅप्टन राजू काळे, श्रीराम लेकुरवाळे, श्री नितीन काळे, डॉ महेंद्र पटवा, डॉ रुपाली शिंदे, श्री सदानंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. शिंदे सरांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त 100 वृक्ष लावण्याचा संकल्प अविनाश दळवी यांनी बोलून दाखविला. शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाविषयी राजू काळे यांनी चिंता व्यक्त करून संस्थाचालकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थी मनोगत झाल्यावर सौ मंदाकिनी शिंदे, डॉ ज्योती पोकळे, सौ प्रीती काळे, प्रा विद्या शिंदे, डॉ रुपाली शिंदे यांनी 90 दिव्यांनी औक्षण केले. यानंतर टाईप सेटिंग करणारे श्री शुभम निकाळजे यांचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते इंग्लिश ए टू झेड या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
स्वागताध्यक्ष श्री किशोर हंबर्डे यांनी शिंदे सरांची शिस्त ऐकून असल्याचे आणि आजच्या पिढीला अशा शिक्षकांची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना श्री भीमराव धोंडे साहेबांनी 90 व्या वर्षी पुस्तक लिहिल्याबद्दल शिंदे सरांचे विशेष अभिनंदन केले. मी त्यांचा विद्यार्थी आहे, त्यांची शिस्त कडक होती, त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. ते माझ्यासाठी आणि इतर सर्वांसाठी ऋषीतुल्य आहेत असे गौरवोद्गार काढले. माजी आमदार श्री साहेबराव दरेकर सुरुवातीला शुभेच्छा देऊन गेले. यावेळी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अतुलकुमार मेहेर, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश भंडारी, प्रधानमंत्री श्री हेमंत पोखर्णा व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोपान निंबोरे, धोंडे कॉलेजचे प्राचार्य डॉ हरिदास विधाते, श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय धोंडे, इंदिरा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल राऊत उपस्थित होते. आष्टी तहसीलचे नायब तहसीलदार श्री पांडुरंग माढेकर, मराठा सेवा संघांचे तालुकाध्यक्ष श्री तानाजी जंजिरे, डॉ कल्याण पोकळे, डॉ अशोक गांधी, कडा गावचे सरपंच श्री युवराज पाटील, माजी सरपंच श्री अनिल ढोबळे, श्री सुनील नाथ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री रमजान तांबोळी, शिरूरचे उद्योजक श्री कृष्णा पानसंबंळ, बीडचे डॉ प्रकाश भोसले, डॉ कमलेश योगे, श्री जगन्नाथ ढोबळे पाटील, सह्याद्री कॉलेज अहिल्यानगरचे श्री नारायण शिनगारे, श्री माणिकराव लगड, सिंदफना येथून आलेले बापूराव शेळके, शिर्डीच्या डॉ सुरेखा देवकर, श्री अशोक गवारे, ऍड शरद चौधरी, श्रीगोंद्याचे डॉ राजेश पाखरे आणि 1964 ते 1996 पर्यंतचे माजी विद्यार्थी, कडा येथील सर्व डॉक्टर्स व व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ बाबासाहेब मुटकुळे यांनी प्रास्ताविक केले, डॉ रवी सातभाई यांनी संचालन केले तर सौ मंदाकिनी शिंदे यांनी आभार मानले.


stay connected