म्हसोबाची वाडी येथे ९४ वा नारळी सप्ताह सोहळा होणार उत्साहात साजरा; नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती
म्हसोबाची वाडी ( राजु गायकवाड) – आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे पारंपरिक धार्मिक परंपरेचा भाग असलेला ९४ वा नारळी सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला जाणार आहे. हा सप्ताह श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला असून परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
हा धार्मिक सप्ताह चैत्र शुद्ध १५, गुरुवार दि. २/४/२०२६ ते चैत्र व. ७, गुरुवार दि. ९/४/२०२६ दरम्यान पार पडणार आहे. या सोहळ्याचे आयोजन महंत श्री. ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सप्ताहादरम्यान दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन आणि हरिकिर्तन यांचा समावेश आहे. तसेच भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सप्ताहात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार सहभागी होणार आहेत. त्यामध्ये
ह.भ.प. केशव महाराज नामदास (पंढरपूर)
ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे ( नेकनूर)
ह.भ.प. अमृत महाराज जोशी (बीड)
ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर)
ह.भ.प. संजय महाराज पाचपोरे (अकोला)
ह.भ.प. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर)
हभप . ज्ञानेश्वर महाराज शिंदे ( आळंदी )
तसेच प्रवचनासाठी ह.भ.प. विनायक महाराज आंधळे, राम महाराज डोंगर, परमेश्वर महाराज जायभाय, मुरलीधर महाराज बारगजे, जनार्दन महाराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सप्ताहाची सांगता ९ एप्रिल २०२६ रोजी होणार असून त्या दिवशी महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम म्हसोबाची वाडी, ता. आष्टी, जि. बीड येथे होणार आहे
या सप्ताहासाठी परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


stay connected