सरकारकडून मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिलासा – २ लाखांपर्यंत कर्जमाफी
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सरकारने सांगितले की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” म्हणून राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
यासोबतच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


stay connected