हिंगलाज येथील माँ हिंगलाज महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

 हिंगलाज येथील माँ हिंगलाज महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात 




धाराशिव :-( प्रतिनीधी)

हिंगलजवाडी ता. तेर येथे दि ७ मार्च रोजी होत असलेल्या माँ हिंगलाज महोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून या कार्यक्रमास माजी मंत्री, आमदार मा. राणा जगजितसिंह पाटील तसेच सौ. अर्चनाताई पाटील हे दाम्पत्य आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

दि ७ रोजी सकाळी ७ वा. पासूनच कार्यक्रम सुरु होणार आहेत. हवन, पुजन, अभिषेक व महाप्रसाद, आदि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल भावसार समाज आयोजकांबरोबरच हिंगलजवाडीचे सरपंच, उपसरंपच व सर्व सदस्य हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करीत आहेत. हा महोत्सव म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नती बरोबरच सामाजिक सक्षमीकरण यादृष्टीने मैलाचा दगड ठरणारा असा हा कार्यक्रम आहे.या कार्यक्रमास नगरसेवक जिल्ला परिषद पंचायत समिती सदस्य हे उपस्थितीत  राहणार आहेत.

*उत्सव नव्हे तर सशक्तीकरण*


7 मार्च रोजी आपण सर्व भावसार बांधव श्री क्षेत्र हिंगळजवाडी येथे एकत्र जमणार आहोत. होम हवन, पुजा, विचारांचे आदान प्रदान, सहभोजन असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे. 

भावसारांची कुठलीही संस्था, संघटना द्वारे आयोजित हा कार्यक्रम नसुन संपूर्ण सकल भावसार समाज आयोजक आहे. 


हा फक्त एक दिवसाचा उत्सव नसुन श्री हिंगलाज मातेच्या छत्रछायेत व मातेच्या आशिर्वादाने समाज सशक्तीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे.

सर्व समाज बांधवांनी माँ हिंगलज, भक्त मंडळींनी या कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन सकल भावसार समाज आयोजकांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.