आष्टी तहसीलचे नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या मातोश्रींचे निधन

 आष्टी तहसीलचे नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या मातोश्रींचे निधन



आष्टी : आष्टी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या मातोश्री कौशल्याबाई चंद्रभान धारक (वय ९०) यांचे आज शुक्रवार (दि. १३ मार्च २०२६) रोजी पहाटे सुमारे ५:०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे धारक कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कौशल्याबाई धारक या साध्या, प्रेमळ व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर कुटुंबाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी धारक कुटुंबीयांना सांत्वन व्यक्त केले आहे.

त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार (दि. १३/०३/२०२६) रोजी सकाळी ११:३० वाजता धानोरा अमरधाम, ता. आष्टी, जि. बीड येथे होणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व धारक कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच सर्वांकडून प्रार्थना व्यक्त होत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली… 💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.