विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक
आमदार उत्तमराव जानकर.
विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक असे मत आमदार उत्तमराव जानकर यांनी जि. प. प्रा. शाळा वेळापूर मुली शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे सभापती दत्ता (भैया) मगर होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीताई सरतापे, गटशिक्षणाधिकारी सौ सुषमा महामुनी, वेळापूर ग्रा. पं. व शाळा व्यवस्थापन समिती तज्ञ सदस्य डॉ. सौ स्नेहलताई जानकर, सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, ताहेरा फाउंडेशनचे हाजी अबूबकर तांबोळी, पिसेवाडी ग्रा. पं. सदस्य साहिल आतार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करिष्मा मुलाणी उपाध्यक्ष मनीषा भानवसे ग्रा. पं. सदस्या प्रियांका आडत,केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती किरण घाडगे मॅडम यांनी केले, शाळेच्या वतीने विविध मागण्या सादर केल्या.
आमदार उत्तमराव जानकर यांचा सत्कार मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी सर यांनी केले.
यावेळी बोलताना. आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, शिक्षणात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचा आहे. यासाठी विविध उपक्रम व स्पर्धा राबविणे गरजेचे आहे. शिक्षण आपल्याला आत्मविश्वास आदर आणि दिशा देते.यामुळेच सुजाण नागरिक घडतो असेही सांगितले.
वेळापूर मुली शाळेत राबवित असलेले विविध उपक्रमाचे कौतुक केले. यासाठी शाळेला भरीव निधी दिला जाईल असेही सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ सुषमा महामुनी यांनी जीवनात शिक्षणाचे महत्त्व विशद केले व वेळापूर मुली शाळा दर्जेदार असल्याचेही सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रणजीत सरवदे यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले
अंगणवाडी व वेळापूर मुली शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार विविध गाणी व नृत्य सादर केले
यावेळी ताहेरा फाउंडेशनचे ् हाजी अबुबकर तांबोळी यांचा सामाजिक कार्य सन्मान आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन रणनवरे, महादेव घोगरे, श्रीम. आसराबाई जैन, श्री. पांडुरंग कुलकर्णी, श्री. नितीन चव्हाण श्री.प्रवीण कुमार पांगे सौ कविता आवटे आदींनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गुरव व लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन नितीन चव्हाण यांनी केले





stay connected