पिंपळेश्वर महादेव मंदिरातील ५१ फूट उंच कलश कामाचा आ.सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ उत्साहात
आष्टी (प्रतिनिधी)
शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे ५१ फूट उंचीच्या भव्य कलश कामाचा शुभारंभ आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या शुभहस्ते रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर उत्साहात पार पडला.
पिंपळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष असलेल्या आमदार धस यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू असून, त्यामध्ये या भव्य कलश उभारणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना आमदार धस यांनी सांगितले की, गोरगरिबांच्या मुला-मुलींचे विवाह सोहळे कमी खर्चात पार पडावेत यासाठी मंदिर परिसरात मंगल कार्यालयाचे काम सुरू असून ते सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच भाविक भक्तांच्या सोयीसाठी येथे “नमो गार्डन” उभारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
या शुभारंभ सोहळ्याला व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मेहेर, खंडू जाधव,राहुल मूथा,बाळू मेहेर,संतोष चव्हाण, देवस्थानचे सचिव संजय मुळे, सदस्य सहस्रबुद्धे, लक्ष्मण रेडेकर, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,अॅड.बाळासाहेब मोरे,सरपंच अशोक मुळे,नगरसेवक सुरेश वारंगुळे,आत्माराम फुंदे, सतिष जंगले, नगरसेवक अक्षय धोंडे, पुरोहित अनंत जोशी,राधाकिसन पोकळे,दीपक निकाळजे,राजू निकाळजे,नगरसेवक किशोर झरेकर,नगरसेवक बाळासाहेब घोडके,विनय पटथरीया,कपिल अग्रवाल,अजित मुळे, निखिल ढेंगे,पत्रकार शरद रेडेकर,पत्रकार प्रविण पोकळे, पत्रकार सचिन रानडे,श्रीकांत भोज,सूरज रोकडे,यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आष्टी शहरासह पंचक्रोशीतील गावांमधील भाविक भक्तांनी या ५१ फूट उंच कलश उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार धस यांनी केले. तसेच परंपरेनुसार गावातील महिला भगिनींचाही या कार्यात सहभाग असतो, त्यामुळे त्यांनाही या उपक्रमाची माहिती देऊन सहभागी करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या भव्य कलश उभारणीमुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या वैभवात अधिक भर पडणार असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


stay connected