धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा जागर
प्रख्यात व्याख्याते राकेश पिंजन यांचे प्रेरणादायी व्याख्यान
-------------
कडा / वार्ताहर
---------------
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त त्यांच्या तेजस्वी जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन सोमवार, दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत कडा येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली.
आपला इतिहास, धर्म आणि राष्ट्रभक्तीची जाज्वल्य प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते राकेश पिंजन सरकार हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदर्शी विचार आणि ऐतिहासिक कार्याचा सखोल आढावा घेणार आहेत. संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्यगाथा, त्यांच्या अतुलनीय बलिदानातून मिळणारी प्रेरणा तसेच हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले महान योगदान या व्याख्यानातून उलगडले जाणार आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन शिवराजे ग्रुपच्या वतीने करण्यात आले असून इतिहासप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
------%-------


stay connected