आष्टीत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी ‘दावत-ए-इफ्तार’ संपन्न

 आष्टीत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी ‘दावत-ए-इफ्तार’ संपन्न




VDO पहा 👇📽️



आष्टी प्रतिनिधी- पवित्र रमजान महिन्याच्या औचित्य साधून आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात व मोठ्या धार्मिक आणि सामाजिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमातून सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला.



आष्टी–पाटोदा–शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे हे मागील चाळीस वर्षांपासून आपल्या निवासस्थानी इफ्तार सोहळा आयोजित करत आहेत. शनिवारी माजी आ. भीमराव धोंडे मित्र मंडळ, आष्टी–पाटोदा–शिरूर’ यांच्या वतीने कार्यक्रमाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक उपवास (रोजा) पाळतात आणि सूर्यास्ताच्या वेळी रोजा सोडण्याच्या प्रक्रियेला ‘इफ्तार’ असे म्हटले जाते. या इफ्तारच्या निमित्ताने विविध धर्म व समाजातील नागरिक एकत्र येऊन स्नेहभोजन करतात. त्यामुळे समाजात बंधुभाव, सलोखा आणि एकोपा वाढीस लागतो. या प्रसंगी आष्टी शहरासह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, समाजसेवक, पत्रकार, व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार करून रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात परस्परांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे आष्टी परिसरात सामाजिक सलोखा आणि ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.