धारक कुटुंबीयांना मा. जि.प. सदस्य देविदास (आबा) धस यांची सांत्वनपर भेट
आष्टी तालुक्यातील सामाजिक वर्तुळात दुःखाची छाया पसरवणारी घटना घडली असून, कै. कौशल्याबाई चंद्रभानशेठ धारक यांचे शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे धारक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या पार्श्वभूमीवर मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. देविदास (आबा) धस यांनी धारक कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
या सांत्वनपर भेटीवेळी मा. सभापती अंकुशरावजी चव्हाण, मा. सरपंच भाऊसाहेब शेळके, आजिनाथ शेळके यांच्यासह संपूर्ण धारक परिवार व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. कौशल्याबाई धारक यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी त्यांच्या कार्याची व स्वभावाची आठवण काढत श्रद्धांजली अर्पण केली.




stay connected