योगेश पोपळे यांची पोलीस दलात निवड

 योगेश पोपळे यांची पोलीस दलात निवड



आष्टी प्रतिनिधी — जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही कठीण परिस्थिती जिंकता येते, याचा प्रेरणादायी आदर्श योगेश पोपळे यांनी घालून दिला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत अनेक संकटांवर मात करत अखेर योगेश पोकळे यांची अहिल्यानगर पोलीस दलात निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

योगेश पोपळे यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. घरची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्यामुळे शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वेळप्रसंगी दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण होते. शिळ्या-भाकरी खाऊन दिवस काढत त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण आणि पोलीस होण्याचे स्वप्न त्यांनी कधीही सोडले नाही. रात्रीचा दिवस करून अभ्यास, अपुऱ्या साधनांमध्येही जिद्दीने तयारी आणि स्वतःवर असलेला अढळ विश्वास यामुळे त्यांनी यशाची शिखरे गाठली. प्रत्येक अडचणीला संधी मानत त्यांनी कठोर परिश्रम केले आणि आज त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबियांचा पाठिंबा आणि त्यागही तितकाच महत्त्वाचा आहे.

योगेश यांच्या निवडीमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. गावकऱ्यांनीही त्यांच्या यशाचे जोरदार स्वागत केले असून अनेकांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते,” असा संदेश योगेश पोपळे यांनी आपल्या यशातून दिला आहे.

आज त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळाली असून, संघर्षातून यशाकडे वाटचाल करण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. भविष्यात देशसेवेच्या कार्यात ते उत्तम कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

योगेश पोपळे यांना पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्रकार दादा पवळ यांचे भाचे आहेत



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.