स्नेह मेळाव्यातून विचारांची देवाण-घेवाण होते :- डॉ. अजयदादा धोंडे
आष्टी ( वार्ताहर):-: गेट-टुगेदर सारख्या कार्यक्रमातून विचारांची देवाण-घेवाण होते त्यामुळे प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम आयोजित करायला पाहिजेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व शेतकरी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. अजयदादा धोंडे यांनी केले.
याबाबत अधिक माहिती आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, आनंद चॅरिटेबल संस्था व भगिनी या संस्थांमधील सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा कर्जत तालुक्यातील मांदळी येथील हाॅटेल सुवर्ण ज्योत येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाबुद्दीन सय्यद हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे डॉ. अजयदादा धोंडे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत,डी. एस. राऊत,
हभप मगर महाराज,
मुख्याध्यापक शिवाजी वनवे, महादेव दानवे, अनभुले, गदादे, श्रीमती मुळे, श्रीमती खेडकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम ठेवावेत. या कार्यक्रमास सर्व सेवा निवृत्त कर्मचारी यांनी वेळात वेळ काढून उपस्थित रहावे. कार्यक्रमामधून एकमेकांचे सुखदुःख समजते तसेच विचारांची देवाण-घेवाण केली जाते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षकांनी संस्थेला काही अत्यावश्यक अशा मार्गदर्शक सूचना कराव्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत यांनी सांगितले की, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय होईल यासाठी संस्था अध्यक्ष व माजी आ. भीमराव धोंडे यांनी गावागावात शाळा सुरू केल्या. आतापर्यंत संस्थेचे १७२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर गाठीभेटी होणे अवघड होते. सेवानिवृत्तीनंतर स्वतःसाठी जगा असे डॉ. राऊत त्यांनी सांगितले.आपण एकत्र आलो आहोत. एकमेकांच्या गाठीभेटी होण्यासाठीच सर्वांच्या प्रेरणेने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सेवानिवृत्त मयत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी हभप मगर महाराज, शहाबुद्दीन सय्यद, बाबासाहेब झगडे, शिवाजी वनवे, महादेव दानवे, सुनिल शिंदे, जगताप, आडसरे महाराज,औटे, खेडकर,गाडे के.बी., शेख शब्बीर, प्रा. मंडलिक, संजय गावडे व इतरांची भाषणे झाली. सुत्रसंचलन गंगाधर बोराडे यांनी केले. उपस्थितांचे आभार भीमराव आहेर यांनी मानले.



stay connected