श्री क्षेत्र तारकेश्वरगडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्रींची माजी आ.भीमराव धोंडेंकडून आस्थेवाईक विचारपूस
------------------
रुग्णालयात जाऊन घेतली सदिच्छा भेट
------------------
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यासह राज्यभरातील लाखो भाविकांचे आणि वारकरी संप्रदायाचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र तारकेश्वरगडाचे पूज्य महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आष्टी तालुक्याचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन महाराजांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची अत्यंत आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना मानसिक बळ दिले.
अहिल्यानगर येथील लोटस (साताळकर) रुग्णालयात महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.महंत आदीनाथ महाराजांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती मिळताच माजी आ.भीमराव धोंडे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या आत्मीय भेटीदरम्यान माजी आ.भीमराव धोंडे यांनी महाराजांशी संवाद साधला आणि त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याची नम्र विनंती केली.डॉक्टरांकडून जाणून घेतली माहिती केवळ सदिच्छा भेट घेऊनच ते थांबले नाहीत,तर महाराजांवर उपचार करत असलेले प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.हर्षवर्धन तन्वर यांचीही माजी आ.भीमराव धोंडे यांनी आवर्जून भेट घेतली.या चर्चेदरम्यान त्यांनी महाराजांच्या उपचारांची सद्यस्थिती, उपचारांना मिळणारा प्रतिसाद आणि पुढील वैद्यकीय नियोजनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले.
लवकरच पुन्हा भक्तांच्या सेवेत रुजू व्हाल
- भीमराव धोंडे
----------------
"परमेश्वराच्या आणि संत-महंतांच्या कृपेने महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे लवकरात लवकर पूर्णतः बरे होतील आणि पुन्हा नव्या ऊर्जेने भक्तांच्या सेवेत तसेच पारमार्थिक कार्यात रुजू होतील,"अशी मनःपूर्वक प्रार्थना माजी आ.भीमराव धोंडे यांनी यावेळी केली.माजी आ. भीमराव धोंडे यांच्या या अनपेक्षित आणि आस्थेवाईक भेटीमुळे महाराजांना सकारात्मक ऊर्जा आणि मोठे मानसिक धैर्य मिळाल्याची भावना यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांनी आणि गडाच्या अनुयायांनी व्यक्त केली.या महत्त्वपूर्ण आणि सदिच्छा भेटीच्या वेळी माजी आमदारांसोबत हनुमंत थोरवे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अजिनाथ सानप यांच्यासह परिसरातील इतर मान्यवर व तारकेश्वरगडाचे भाविक उपस्थित होते.
-----------------




stay connected