*अॕड.श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील मोर्चास लोहा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे-बी.बी.गायसमुद्रे*
++++++++++++++++++
लोहा चंद्रकांत वाघमारे
दि.२३ मार्च रोजी नागपूर येथील आरएसएस च्या मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेस च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात लोहा तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे लोहा येथील जेष्ठ मार्गदर्शक तथा महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बी बी गायसमुद्रे यांनी केले आहे.
पुढे बी बी गायसमुद्रे यांनी असे नमूद केले की,
केंद्रातील मोदी सरकार हे अमेरिकन धार्जिणे असुन एपस्टिन फाईल बाहेर आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दबावाखाली राहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरएसएस ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसविले व आता आर एस एस ने चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून दूर करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी व आर एस एस चे धोरणे हे देशासाठी घातक असुन यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो अॅड बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या वतीने दि. २३ मार्च रोजी नागपूर येथील आरएसएस च्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून तेव्हा या मोर्चात लोहा तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोहा येथील वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ मार्गदर्शक तथा महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बी बी गायसमुद्रे यांनी केले आहे.



stay connected