आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नाने २५ कोटींच्या रस्ता सुधारणा कामांना मंजुरी
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी-पाटोदा-शिरूर (कासार) विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व दमदार आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती नियोजन विभागाचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार सुरेश धस यांनी मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखाशीर्ष ५०५४-०४ अंतर्गत आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यातील अनेक रस्ते अत्यंत नादुरुस्त झाले असून त्यांची तातडीने सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे.
मंजूर करण्यात आलेल्या प्रमुख कामांमध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे :
कानडी – आनंदवाडी – पिंपरी घुमरी रस्ता (प्रजिमा ०९) कि.मी. ०/०० ते १०/०० सुधारणा – ६ कोटी ५० लाख रुपये
कडा – निमगाव चोभा – नांदा रस्ता (प्रजिमा १०) कि.मी. ०/०० ते ८/५०० सुधारणा – ३ कोटी ५० लाख रुपये
राज्यमार्ग ७० ते बावी – कणसेवाडी – बीडसांगवी – देसूर – शेकापूर – आष्टी जामगाव – बळेवाडी (राज्यमार्ग १७) कि.मी. ३५/०० ते ४०/०० सुधारणा – १ कोटी ५० लाख रुपये
राज्यमार्ग ५७ चोभा निमगाव – कानडी बुद्रुक ते प्रजिमा-२ रस्ता कि.मी. ०३/०० ते ०९/०० सुधारणा – ३ कोटी ५० लाख रुपये
बीड राष्ट्रीय महामार्ग २११ पालवन – नागझरी – बेनसूर – भायाळा – वैद्यकिन्ही – वैजाळा – पाचेगाव – पाचंग्री रस्ता कि.मी. ३३/५०० ते ३९/५०० सुधारणा – ३ कोटी ५० लाख रुपये
जिल्हा सरहद्द घोगस – पारगाव – माथुरी – सावरगाव मार्गे शिरूर – दहिवंडी – रुपुर – हिंगेवाडी रस्ता (बोरगाव गावाजवळ) पुलाची पुनर्बांधणी – ३ कोटी रुपये
सावरगाव – शेडाळा – देऊळगाव घाट – पिंपळगाव घाट – वडगाव रस्ता येथे पुलाची पुनर्बांधणी – १ कोटी ५० लाख रुपये
राज्यमार्ग ५७ ते आष्टी – जामगाव – डोणगाव रस्ता (राज्यमार्ग ४०९) कि.मी. ०५/०० ते ०६/६०० पूलासह रस्ता सुधारणा – २ कोटी रुपये
अशा प्रकारे एकूण २५ कोटी रुपयांच्या रस्ता सुधारणा कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिक व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून या कामांना मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ.सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.

.jpeg)
stay connected