मौजे निळा येथे आर ओ पाणी फिल्टर प्लॅन्ट ATW मशीन चे उदघाट्न संपन्न ..

 मौजे निळा येथे आर ओ पाणी फिल्टर प्लॅन्ट ATW मशीन चे उदघाट्न संपन्न ..



लोहा:- चंद्रकांत वाघमारे 

लोहा तालुक्यातील  मौजे निळा येथे आर ओ पाणी फिल्टर प्लॅन्ट ATW मशीन चे उदघाट्न कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सरपंच बालाजी गजले, सुधाकर हिंगोले प्रकल्प समन्वयक बालाविकासा सामाजिक संस्था नांदेड, पोलीस पाटील सोपानराव मोरे, गोविंदराव मोरे, जमालसाब शेख, पत्रकार चंद्रकांत वाघमारे, बालाजी वाघमारे, खुशाल मोरे, बाबाराव जाधव, प्रकाश मोरे, मकरंद गिरी, व इतर सर्व नागरिक उपस्थित होते.त्या प्रसंगी 

प्रकल्प समन्वयक बालाविकासा सामाजिक संस्था नांदेड,चे सुधाकर हिगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले 

त्यात 

बालविकास आणि कमल उज्वला फाउंडेशन या संस्थांबद्दल थोडक्यात माहिती दिली  

*बालविकास 

 ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी सध्या स्थित लोहा तालुक्यातील १६ ग्रामपंचायत वर आपले  कार्य करत आहे गावातील नागरिक स्वावलंबी बनवण्यासाठी काम करते. त्यांचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे आसेही ते म्हणाले 

*कमल उज्वला फाउंडेशन* (Kamal Ujjwala Foundation या संस्थेचे कार्य सामाजिक विकास, शिक्षण, आणि स्वच्छता यांसारख्या क्षेत्रांमध्ये आहे. ते विविध सामुदायिक प्रकल्पांमध्ये भाग घेतात आणि लोकांना स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा, आणि शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.

जल शुद्धीकरण प्रकल्पाचे महत्त्व:

- स्वच्छ पाण्याची उपलब्धता वाढवते पाण्यामुळे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करते नागरिकांचे आरोग्य  जीवनमानात सुधारणा करते तर गावात आसे अनेक प्रकल्प 

-  व विविध प्रकारचे काम करायचे असेल तर गावातील नागरीकांनी लोक सहभाग वाढवावा व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा आसे सुधाकर हिगोले यांनी आव्हान केले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.