Suresh Dhas Birthday : आ. सुरेश धस यांनी आपला वाढदिवस स मच्छिंद्रनाथ गडावर शब्दरूपी शुभेच्छा स्विकारल्या समर्थकांनी दिली मंदिर जीर्णोद्धारासाठी कोट्यवधी रुपयांची देणगी

 आ. सुरेश धस यांनी आपला वाढदिवस स मच्छिंद्रनाथ गडावर शब्दरूपी शुभेच्छा स्विकारल्या
समर्थकांनी दिली मंदिर जीर्णोद्धारासाठी कोट्यवधी रुपयांची देणगी

*****************************




*****************************


आष्टी (प्रतिनिधी)


राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर नाथभक्त माजी मंत्री तथा आमदार सुरेश धस यांनी आपला ५६ वा वाढदिवस कोणताही जल्लोष न करता श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर साधेपणाने साजरा केला. श्री मच्छिंद्रनाथ बडे बाबांच्या सानिध्यात त्यांनी समर्थक, कार्यकर्ते व भाविकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

      यावेळी आ. सुरेश धस यांनी शाल, श्रीफळ, फेटा किंवा कोणत्याही भेटवस्तू स्वीकारण्यास नकार देत, समर्थक व भाविकांच्या शब्दरूपी शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित नागरिक, कार्यकर्ते व भाविकांनी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील गाभाऱ्याच्या बांधकामासाठी यथाशक्ती देणगी देत आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या दीर्घायुष्याची व यशस्वी कार्याची कामना केली. या देणगीतून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

या प्रसंगी आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आमदार सुरेश धस यांची गडावर सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील विकासकामांची वेळोवेळी पाहणी करावी. लाखो नाथभक्तांनी श्रद्धेने दान दिले असून मदतनिधीचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे.”

याचवेळी त्यांनी काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून गडाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. बालाघाट परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये घडणाऱ्या अपघाती घटनांचा संबंध श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाशी जोडून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात, हे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडावर सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर व सकारात्मक माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले.

पत्रकारांनी यावेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून अत्यंत सुबक व कलाकुसरीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. नाथभक्त व सेवक या नात्याने आमदार सुरेश धस हे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, भाविकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.परिसरातील गावोगावातून गाभाऱ्याच्या बांधकामासाठी देणगीचा ओघ सुरू असून, समाजहितासाठी संवेदनशील व संयतपणे कार्य करणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्या कार्याचे नाथ संप्रदायातच नव्हे तर संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांच्या शुभेच्छा.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,सभापती राम शिंदे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील,भाजपा प्रदेश सरचिडणीस नवनाथ पडळकर, सुजितशिंग ठाकूर,खा.निलेश लंके,आ.महेश लांडगे,आ.विक्रम पाचपुते, आ.प्रशांत ठाकूर आ.नारायण कुचे ,आ.राहुल ढिकले आ.मोनिका राजळे,आ. नितेश राणे

आ.भीमराव तापकीर,माजी आ.भीमराव धोंडे, ओमप्रकाश शेटे,नंदकिशोर मुंदडा, धनंजय देशमुख आदींनी दूरध्वनी समक्ष आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार सुरेश धस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.





३५७  रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्त रक्तदान


आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखावा न करता समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. याच अनुषंगाने श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ३५७ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले.




१ कोटी ३३ लाख रुपयांची देणगी झाली जमा
आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखावा, हार-दुरे, फेटे किंवा भेटवस्तूंवर खर्च न करता त्या सर्व निधीचा वापर थेट श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करण्यात आला. समर्थक, कार्यकर्ते व भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीतून एकूण १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. ही देणगी श्री मच्छिंद्रनाथ गडाच्या गाभारा बांधकाम व इतर विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.