*घरातून रागात निघून गेलेला 13 वर्षांचा अल्पवयीन मुलगा 24 तासांत सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात- अंभोरा पोलिसांची कामगिरी*
अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील खुंटेफळ (वा.)येथील 13 वर्षाचा अल्पवयीन मुलगा घरातून रागात निघून गेल्याची तक्रार अंभोरा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच, अंभोरा पोलीसांनी प्रकरणाची संवेदनशीलता व गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आणि तत्परतेने गु.र.क्र.28/26 कलम 137(2) BNS प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून शोधकार्य सुरू केले.
पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 24 तासांच्या आत मुलाचा शोध घेऊन त्यास अहिल्यानगर येथून सुखरूप ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही करून त्यास नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द केले आहे.
मुलगा सुरक्षितपणे परत मिळाल्याने मुलाचे नातेवाईक भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आले, तसेच त्यांनी अंभोरा पोलीसांच्या तत्परतेबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
सदरची कामगिरी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावंत सर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळकृष्ण हनपुढे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे, पोऊनि चंद्रकांत तावरे, पोह/अतुल दाताळ, पोशिं/सतीश पैठणे व कृष्णा लव्हारे यांनी पार पाडली.
अंभोरा पोलीस स्टेशन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून, अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांनी त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


stay connected