कड्यात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन

 कड्यात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन 




कडा | रहेमान सय्यद 

             आष्टी तालुक्यातील कडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शिव महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले असून मोठ्या थाटामाटात हा शिव महोत्सव १६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार आहे.चार दिवस विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. यामध्ये दि. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता होम मिनिस्टर क्रांती मळेगावकर यांचा सन्मान स्त्री शक्तीचा 

हा कार्यक्रम होणार आहे. तर दि. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता राष्ट्रीय शिवशंभू व्याख्यान होईल. दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता संदिप देवा दाणी सांगवीकर यांच्या वेद मंत्रात शिवमुर्ती दुग्धाभिषेक होईल.याच दिवशी सायंकाळी ६ वाजता गडकिल्ले बक्षीस वितरण होईल आणि रात्री ८ वाजता युवा शाहीर प्रसाद आदिनाथ विभूते यांचा शाहिरी शिवदर्शन पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम ( झी मराठी फेम)  होणार आहे. दि. १९ फेब्रुवारी रोजी मुख्य शिवजन्मोत्सव सोहळा दिवशी सकाळी १० वाजता शिवस्मारक पूजन आणि सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तसेच सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत भव्य शोभा यात्रा निघणार आहे. या ऐतिहासिक शोभा यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा,आघोरी पथक, कोल्हापूरी हलगी सनई पथक, वासुदेव पथक धाराशिव, मल्लखांब पथक,समई पथक, मावळे पथक, मोटु पतलू जोडी, रोप मल्लखांब पथक,घोडे पथक, बाहुबली हनुमान,लेझीम पथक, जनता ब्रास बँण्ड पाटोदा, आणि स्वर संगीत बँजो आंबेजळगाव यांसारखी विविध पथके सहभागी होणार आहेत. यावेळी महाप्रसादाचे अन्नदाते हाँटेल किनारा, शिव कलेक्शन,न्यू प्रिन्स टेलर्स पोलिस उप अधिक्षक रवींद्र भोसले आहेत. सर्व शिवभक्तांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शिवजयंती उत्सव समिती कडा शहर, शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कर्डिले, उपाध्यक्ष सागर शिंदे, सचिव अर्जुन गावडे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.