अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष मा.प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते,'रंग माझा वेगळा' कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

 *अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष मा.प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते,'रंग माझा वेगळा' कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न.*



अहिल्यानगर:- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सावेडी तर्फे जिल्ह्यातील साहित्यिकांची सहविचार संवाद सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री नरेंद्र फिरोदिया सावेडी शाखाध्यक्ष, उद्योगपती हे होते. तर प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी इत्यादी मान्यवर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जयंत येलूलकर महाराष्ट्र साहित्य परिषद नगर जिल्हाप्रमुख यांनी केले. 

या कार्यक्रमात कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांच्या 'रंग माझा वेगळा' या कथासंग्रहाचे प्रकाशन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा कथासंग्रह सकाळ प्रकाशन ने काढलेला असून, त्यास ज्येष्ठ साहित्यिक कथा लेखक सदानंद भणगे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. 

सदर कथासंग्रहात  दै. नगर टाइम्स संपादक श्रीराम जोशी यांचा 'माणसे वाचणारा अवलिया' हा कथासंग्रहावर भाष्य करणारा लेख समाविष्ट आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सदानंद भणगे, चंद्रकांत पालवे, संजय कळमकर, लीला गोविलकर, शब्बीर शेख, श्रीराम जोशी ,विजयसिंह होलम, सुदर्शन धस, श्री सुनील गोसावी, सौ शर्मिला गोसावी, सौ शामा मंडलिक , चंद्रकांत जोशी, एम.पी. दिवान, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, ल धो खराडे ,अरविंद ब्राह्मणे, नंदकुमार देशपांडे,प्रा. स्वाती अहिरे, हे मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक मा.प्रा. गणेश भगत यांनी केले.

आभार प्रदर्शन सौ.प्रा. उपाध्ये यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.