कडा येथे जैन साधू-साध्वींची भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न

 कडा येथे जैन साधू-साध्वींची भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न



कडा - आष्टी / तेजवार्ता न्यूज नेटवर्क / सय्यद बबलूभाई

येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने जैन धर्माचे राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांचे शिष्य, प्रबुद्ध विचारवंत परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्या उपस्थितीत जैन साधू व साध्वींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

ही शोभायात्रा कडा येथील जैन धर्मस्थानकापासून प्रारंभ झाली.


Vdo पहा📽️📡📺👇



 अनेक संत-महासतींची उपस्थिती

या यात्रेत परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्यासह

उपप्रवर्तक अक्षय ऋषीजी महाराज, अमृत ऋषीजी महाराज, गीतार्थ ऋषीजी महाराज, तसेच महासतीजी उदय प्रभाजी महाराज व महासतीजी विपुल दर्शनाजी महाराज आदी ठाणा उपस्थित होते.

यावेळी कडा श्रावक संघाचे तसेच अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या शोभायात्रेत मोतीलाल कोठारी विद्यालयाचे NCC पथक, स्काऊट-गाईड पथक, तसेच संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

यामध्ये —

फार्मसी कॉलेज

डी फार्मसी कॉलेज

गांधी महाविद्यालय

पीएम मनोज ज्युनिअर कॉलेज

अमोलक युनिव्हर्सल स्कूल

चंदनमल भळगट प्राथमिक शाळा

आदी विभागांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत सहभाग घेत यात्रेची शोभा वाढवली.

 घोषणांनी परिसर दुमदुमला

जैन स्थानकापासून अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी दुतर्फा रांगा लावून स्वागत केले.

यावेळी “महावीर स्वामी की जय”, “जय आनंद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

माजी विद्यार्थी तसेच बाहेरगावी गेलेले जैन धर्मीय बांधवही या महाराजांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.