शिवरायांचे शौर्य, वर्चस्व, दृढ निश्चय अनुकरणाचे प्रतीक आहे - प्रशांत सरूडकर.

 शिवरायांचे शौर्य, वर्चस्व, दृढ निश्चय अनुकरणाचे प्रतीक आहे -  प्रशांत सरूडकर




      शिवरायांचे शौर्य, वर्चस्व, दृढ निश्चय अनुकरणाचे प्रतीक आहे, असे मत इतिहासकार प्रशांत सरुडकर यांनी शाळा वेळापूर मुली येथे शिवजयंती निमित्त व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.

    या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड होते.

      यावेळी बोलताना सरूडकर म्हणाले की, शिवराय थोर मुत्सद्दी होते,कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्यांनी आपले कार्य पार पाडले, ते लोकांचे राजे मानले जात आहेत. त्यांचे कार्य जगात आदर्शप्रिय ठरलेले आहे.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांनी केले.

    जि. प. सदस्या सौ. मीनाक्षी सरतापे, सरपंच रजनीश बनसोडे,आरपीआय चे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, प स. माजी सदस्या रेणुकाताई माने देशमुख  डॉ. शुभांगी ताई माने देशमुख, वेळापूर मेडिकल असोसिएशनचे किशोर काळे पाटील, वेळापूरचे माजी उपसरपंच जावेद मुलानी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रमेश पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा  सौ. करिष्मा मुलाणी, उपाध्यक्ष सौ मनीषा भानवसे, ग्रामपंचायत सदस्यासौ. प्रियंका आडत, साहिल आतार, रणजीत सरवदे सुनील साठे महेंद्र साठे बाळासाहेब बनसोडे  सौ. सुषमा यादव, कृपाळ गुरुजी आदी उपस्थित होते.  

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुमार पांगे यांनी केले आभार प्रदर्शन नितीन चव्हाण यांनी केले.

     कार्यक्रमासाठी जीवन रणनवरे, श्रीमती आसराबाई जैन, श्रीमती किरण घाडगे, सौ. कविता आवटे आदींनी परिश्रम घेतले.

     कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक वर्ग, शिक्षणप्रेमी आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.