आष्टी मतदारसंघात शिवजयंती उत्साहात साजरी
१०१ फूट उंच भगव्या ध्वजाचे दिमाखदार ध्वजारोहण; आ. सुरेश धस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी मतदारसंघात शिवजयंतीनिमित्त आयोजित विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले. विविध ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमांमधून स्वराज्य, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठ शासनव्यवस्थेचा संदेश देत समाजहितासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १०१ फूट उंच ध्वजारोहण समारंभ दिमाखात पार पडला. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त आयोजित विविध शालेय स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्यात आले.
पांढरी (ता. आष्टी) येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होत महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जाती-पाती व धर्माच्या पलीकडे जाऊन समतेचे आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित करणाऱ्या शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मुर्शदपूर (ता. आष्टी) येथील माऊली नगर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करून स्वराज्य स्थापनेतील अद्वितीय शौर्य, शिस्तबद्ध लष्करी संघटन आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश अधोरेखित करण्यात आला.
शिवतीर्थ निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला.
जळगाव, कडा कारखाना परिसर (ता. आष्टी) येथेही महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे स्मरण करण्यात आले.
मौजे कुसळंब (ता. पाटोदा) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामस्थांशी संवाद साधताना शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा गौरव करण्यात आला.
आष्टी येथील श्रीराम मंदिरात आयोजित शिवजयंती कार्यक्रमात महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. धर्म, न्याय आणि स्वाभिमानाच्या अधिष्ठानावर उभारलेले स्वराज्य आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
आष्टी शहरातील वडाचा गणपती, भाजी मंडई रोड परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मानवंदना अर्पण करण्यात आली. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा आणि सर्वसमावेशक, लोकाभिमुख राज्यव्यवस्थेचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १०१ फूट उंच ध्वजारोहण समारंभ दिमाखात पार पडला. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त आयोजित विविध शालेय स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्यात आले.
पांढरी (ता. आष्टी) येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होत महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जाती-पाती व धर्माच्या पलीकडे जाऊन समतेचे आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित करणाऱ्या शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मुर्शदपूर (ता. आष्टी) येथील माऊली नगर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करून स्वराज्य स्थापनेतील अद्वितीय शौर्य, शिस्तबद्ध लष्करी संघटन आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश अधोरेखित करण्यात आला.
शिवतीर्थ निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला.
जळगाव, कडा कारखाना परिसर (ता. आष्टी) येथेही महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे स्मरण करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना मतदारसंघातील मान्यवर, नागरिक, युवक, महिला, पत्रकार बांधव व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

stay connected