📰 तेजवार्ता न्यूज / शेख राजू
केळ पिंपळगाव येथे बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण
📍 आष्टी | प्रतिनिधी
🗓️ दि. १८ फेब्रुवारी २०२६
🕖 रात्री ७:४६ वाजता
आष्टी तालुक्यातील केळ पिंपळगाव येथे बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष दळवी यांच्या शेतात नांगरट सुरू असताना शेताच्या कडेला हालचाल दिसून आली. काही क्षणातच ते बिबट असल्याचे स्पष्ट झाले.
बिबट काही वेळ शेत परिसरात फिरताना दिसला व त्यानंतर झाडीत अदृश्य झाला. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीत केला असून संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा पशुधनाची हानी झाली नाही, मात्र ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती सरपंच सचिन दळवी यांनी तात्काळ वनविभागाला दिली. वनअधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे तसेच लवकरच प्रत्यक्ष पाहणी व शोधमोहीम राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाऊ नये, गटानेच शेतकाम करावे, टॉर्च व प्रकाशाची साधने सोबत ठेवावीत तसेच पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बिबट्याच्या हालचालीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभाग किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
✍️ तेजवार्ता न्यूज | राजु शेख |आष्टी


stay connected