तलाव भरलेला,तरी पाटोदा तहानलेला; शहरातील नागरिकांना नगरपंचायतच्या बेजबाबदार पणामुळे पंधरा दिवसांला पाणी – निलाताई पोकळे

 तलाव भरलेला,तरी पाटोदा तहानलेला; शहरातील नागरिकांना नगरपंचायतच्या बेजबाबदार पणामुळे पंधरा दिवसांला पाणी – निलाताई पोकळे



पाटोदा (प्रतिनिधी) आष्टी मतदार संघातील पाटोदा शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावात मुबलक पाणी साठा असतानाही पाटोदा नगरपंचायच्या गलथान कारभारामुळे शहराला पंधरा दिवसांला एकदाच पाणीपुरवठा करत असून नागरिकांची उघडपणे आडवणूक केली जात आहे. तळ्यात पाणी उपलब्ध असताना पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत असल्याने नगरपंचायतीच्या बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.महिला,वृद्ध व लहान मुलांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. हे अपयश नाही, तर नागरिकांवर लादलेली जबरदस्ती आहे, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्त्या निलाताई पोकळे यांनी केला आहे. तात्काळ नियमित पाटोदा नगरपंचातने पाणीपुरवठा सुरू न केल्यास पाटोदा नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्या निलाताई पोकळे यांनी देण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.