मच्छिन्द्रनाथ गडावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आरोपीस अटक मुद्देमाल ही जप्त
आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील मायंबा गड येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना या संधीचा गैरफायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीविरोधात अंभोरा पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे.
सदर ठिकाणी अमावस्येनिमित्त मोठी यात्रा भरत असून चोरीचे प्रकार घडल्याने अंभोरा पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने तात्काळ तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज, गुप्त बातमीदार व प्रत्यक्ष तपासाच्या आधारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी सुधीर रावसाहेब कराळे (रा. धामणगाव देवीचे ता. पाथर्डी, जि.अहिल्यानगर) याने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची 02 तोळ्याची चैन जप्त करण्यात आली आहे. सदर टोळीतील इतर फरार आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांचा शोध व अटक करण्यासाठी विशेष पथकाद्वारे तपास सुरू आहे.
__________
*अंभोरा पोलिसांकडून यात्रास्थळी व गर्दीच्या ठिकाणी चोरी, फसवणूक व इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सातत्याने कडक नजर ठेवण्यात येत असून नागरिकांनी देखील आपले मौल्यवान दागिने व साहित्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.*
____________
सदरची कामगिरी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावंत सर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळकृष्ण हनपुडे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे, पोउपनि आदिनाथ भडके, पोह/हरिभाऊ बांगर, मुकुंद एकशिंगे,राजेंद्र वायकर, पोशि/ कृष्णा नरवडे, जयराम उभे, अमोल शिरसाठ, स्थागुशाचे अंमलदार अशोक दुबाले व सोमनाथ गायकवाड यांनी पार पाडली आहे.


stay connected