पोलीस पाटील पदभरती मुलाखती संदर्भात महत्त्वाचे आवाहन – तहसीलदार वैशाली पाटील

 पोलीस पाटील पदभरती मुलाखती संदर्भात महत्त्वाचे आवाहन – तहसीलदार वैशाली पाटील




आष्टी (प्रतिनिधी) पोलीस पाटील पदभरतीच्या मुलाखती दि. ०१/०३/२०२६ ते दि. ०८/०३/२०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, मुलाखतीमध्ये जास्त गुण मिळवून देण्याचे आमिष काही व्यक्तींमार्फत उमेदवारांना दाखविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

यासंदर्भात आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मुलाखतीचे गुणदान कोणत्या पद्धतीने व कोणत्या निकषांवर होणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे. गुणदान ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व ठरलेल्या निकषांनुसारच होणार आहे.

तरी सर्व उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन आष्टी तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.