तलाह आसिफ शेख व हमजा अफजल शेख या दोन चिमुकल्यांचा पहिला रोजा पुर्ण
आष्टी (प्रतिनिधी) मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम समाजातील लहान चिमुकल्यांना वगळून इतर सर्वांना रोजा (फर्ज) सक्तीचे असतात. परंतु घरात पालकांचे पाहून हे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. अश्याच प्रकारे आष्टी शहरातील दारू गल्ली येथील रहिवाशी असलेले शेख अफजल , व शेख आसिफ यांच्यातून चिमुकल्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला रोजा काटेकोरपणे पुर्ण केला आहे. यावर्षीचा पवित्र रमजान महिना 18 फेब्रुवारी 2026 पासून रोजीच्या सायंकाळ पासून आरंभ झाला. या पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा शुक्रवारी दि.20 फेब्रुवारी रोजी होता. हा पहिला रोजा आष्टी येथील इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या तलाह आसिफ शेख (वय 6 वर्ष)व इयत्ता तिसरी शिक्षण घेणारा हमजा अफजल शेख (वय ९ वर्ष)या दोन्हीही चिमुकल्यांनी (वय ९ वर्ष),या दोन भावांनी धरला होता. या दोघांनी दिवससभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंबही न घेता काटेकोरपणे आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पुर्ण केल्याबद्दल नातेवाईक व इतरांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.


stay connected