कारवाई होत नसल्याने महाराजांचा अपमान होत आहे - डॉ परवेज अशरफी
नगर - १९ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महराज जयंती साजरी केली गेली. त्या अनुषंगाने अहमदनगर मध्ये ही जयंती साजरी करण्यात आली. वेगवेगळ्या मंडळाने आपल्या आपल्या परीने मिरवणूकित सहभाग घेतला. त्यात पैलवान प्रतिष्ठान या मंडळाचे काही कार्यकर्तेयांनी भारताचा पहिला आतंकवादी तसेच महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसे यांचे फलक मिरवणुकीत आपल्या प्रतिष्ठानच्या गाडीवर लावले.व सोबत शहराचे आमदार संग्राम जगताप यांचेही फोटो होते. सदर मिरवणूक पाहिल्यास असे दिसते की या मंडळाने त्यांची मानसिकता स्पष्ट केली आहे. तसेच असे दाखवले आहे की ते भारताच्या पहिला आतंकवादी तसेच महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसे यांची विचारधारा मानत असून त्यांचे विचारधारेवर चालणार आहे. असा आरोप एमआयएम चे जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केला. व याबाबत पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना निवेदनचे पत्र पाठविण्यात आले. निवेदनात असे आहे की,अशी विचारधारा हि देशासाठी घातक असून भविष्यात देशाला असे विचारसरणीच्या संघटने पासून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रतिष्ठान हे युवा पिढीला आतंकवादाच्या मार्गावर नेहत असल्याची शक्यता दिसत आहे.
पहिलवान प्रतिष्ठान व त्यांचे कार्यकर्ते यांना महाराष्ट्रात विशेषता अहमदनगर मध्ये दंगल घडून आणायची आहे. त्यासाठी हे संधी शोधात आहे. याच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जयंतीच्या एक दिवस अगोदर बेकायदेशीर जमाव जमून मुस्लीम विरोधी घोषणाबाजी केली असल्याचे विडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. यामुळे यांचा उद्देश स्पष्ट दिसत आहे कि यांना दंगल घडवायची आहे.
डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा आणि हत्यारा नथुराम गोडसे याला मानणारा व्यक्ती एक असू शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले आणी त्यांचे राज्यात सर्व धर्माचे नागरीक आपल्या धर्मा प्रमाणे राहत होते. त्याउलट महात्मा गांधी यांचा हत्यारा नथूराम गोडसे यांनी स्वतंत्र भारतात सर्वात पहिला खून केला. त्यामुळे दोन वेगळे विचारसरणीचे एकच व्यक्ती असणे शक्य नाही. या मिरवणुकीत ज्या प्रकारे महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसे यांचा फोटोचा वापर मिरवणुकीत करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. एमआयएम ने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ परवेज अशरफी यांनी आरोप केला की मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीत असेच प्रकार घडले होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु कारवाई करण्यात आली नसल्याने सदर तक्रार पोलीस महानिरीक्षक, नाशिक विभाग यांना देण्यात येत आहे.
खरंच प्रशासन कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहे का कोणाच्या दबावाखाली काम करत आहे यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होऊन ही कारवाई होत नसले तर प्रशासन महाराष्ट्राला कुठे नेहत आहे हे महत्त्वाचे आहे असे म्हटले आहे.
आपला
डॉ.परवेज अशरफी 9890006580

stay connected