सात वर्षीय मुस्कानचा पहिला रोजा पुर्ण
कडा(प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, कडक उन्हाच्या झळा सोसत असतानाही मोठ्यांसोबत आता लहान मुलांमध्येही उपवास करण्याची मोठी जिद्द पाहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथील सात वर्षीय मुस्कान सिराज शेख हिने तिच्या आयुष्यातील पहिला रोजा रविवार दिं.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीपणे पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाने लहान असूनही, पहाटेच्या सहरी 'पासून ते सायंकाळच्या 'इफ्तार पर्यंत अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही न घेता आपला हा पहिला रोजा तिने पूर्ण केला.
मुस्कान ने रोजा धरल्यामुळे शेख कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तिचे वडील सिराज शेख आणि कुटुंबीयांनी मुस्कान चे विशेष कौतुक केले. तसेच नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून मुस्कानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


stay connected