कालिकादेवी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

 *कालिकादेवी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*  




डॉ.उद्धव घोशीर- 

शिरूर का. येथील कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाविद्यालयात करण्यात आले आहे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामीण साहित्यिक मा. भास्कर बडे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रशांत शिंदे गटशिक्षण अधिकारी शिरूर का तसेच  संध्या कुलकर्णी गट साधन व्यक्ती शिरूर का.यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय,तृतीय, उत्तेजनार्थ पारितोषिक व गौरव चिन्ह देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा कनिष्ठ गट व वरिष्ठ गट या गटांमध्ये होणार आहे.तरी शिरूर तालुक्यातील शाळा व   महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.