पोलीस पाटील पदभरती 2026 : पाटोदा उपविभागातील मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
पाटोदा (जि. बीड) : पोलीस पाटील पदभरती 2026 अंतर्गत दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधित उमेदवारांची नावे (रोल नंबरनुसार) जाहीर करण्यात आली आहेत.
प्रसिद्ध यादीतील सर्व पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीस उपस्थित राहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2026 पासून निश्चित करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटोदा येथे मुलाखती होणार आहेत.
उमेदवारांनी मुलाखतीस येताना खालील कागदपत्रांची मूळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे :
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (इयत्ता 10 वी पासून पुढील सर्व)
रहिवासी दाखला
पोलीस पाटील वारस असल्यास त्यासंबंधीचा पुरावा
होमगार्ड/एनसीसी/इतर अतिरिक्त उपक्रमांची प्रमाणपत्रे (असल्यास)
सदर पात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळ https://beedpp.recruitonline.in तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी, पाटोदा तथा अध्यक्ष पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया समिती-2026 यांनी ही माहिती प्रसिद्ध केली असून सर्व पात्र उमेदवारांनी नियोजित वेळेत व दिनांकास मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


stay connected