आष्टी तालुक्याची कामधेनू महेश सहकारी साखर कारखाना येणाऱ्या गळीत हंगामात सुरू होणार, शेतकरी बांधवांनी ऊसाचे उत्पन्न वाढवावे - मा.आ.भिमरावजी धोंडे Kada Karkhana

 आष्टी तालुक्याची कामधेनू महेश सहकारी साखर कारखाना येणाऱ्या गळीत हंगामात सुरू होणार, शेतकरी बांधवांनी ऊसाचे उत्पन्न वाढवावे - मा.आ.भिमरावजी धोंडे 








शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण; १२ वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना मा.आ.भिमरावजी धोंडे च्या नेतृत्वाखाली पुनर्जिवित प्रत्यक्षात काम सुरू 


आष्टी ( प्रतिनिधी ):-



आष्टी तालुक्याची कामधेनू असलेल्या महेश सहकारी साखर कारखाना मागिल १२ वर्षापासून बंद अवस्थेत होता.साखर कारखाना नवीन संचालक मंडळाच्या ताब्यात गेला आहे.शेतक-यांचे नेते मा.आ.भिमराव‌ धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने कर्ज भरून कारखाना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे.अनेक वर्षांपासून बंद असलेल्या साखर कारखान्याचे रविवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी श्रीफळ वाढवून पूजन  करून प्रत्यक्ष मशनरी दुरुस्ती व ओव्हर आॅइलिंग कामाचा शुभारंभ मा.आ.भिमरावजी धोंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिल व बायलर डिजी सेट चे विधीवत पुजन करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली पुढील गळीत हंगामात कारखाना सुरू होणारच असल्याचा विश्वास व्यक्त करत शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊसाचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी केले ते कडा महेश सहकारी साखर कारखाना प्रत्यक्ष कामकाज पुजन प्रसंगी बोलत होते.यावेळी अजय दादा धोंडे,अभयराजे धोंडे,राजु काका धोंडे,नियामत बेग साहेब, अॅड.हनुमंत थोरवे,आरपीआय तालुकाध्यक्ष अशोक साळवे, राजाराम ननवरे,स्विकृत सदस्य बबनराव औटे, हरिभाऊ जंजिरे,सोनाजी गांजुरे,लांडगे मामा, पांडुरंग गावडे,शहादेव गर्जे,नानाभाऊ वाडेकर, अंकुश मुंडे, बजरंग कर्डिले, सरपंच दादा जगताप, सुनिल शिंदे,कुंडलिक आस्वर, पत्रकार उत्तम बोडखे, पत्रकार संजय खंडागळे,पत्रकार संतोष नागरगोजे,पत्रकार अक्षय विधाते, छायाचित्रकार शरद गर्जे, संचालक बाबासाहेब आंधळे,आदी उपस्थित होते.पुढे बोलताना मा.आ.भिमरावजी धोंडे म्हणाले की कारखाना अनेक वर्षापासून बंद असल्याने बरेच काम करणे आहे.सहा सात महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये काम पूर्ण करून पुढील गळीत हंगामामध्ये कारखाना सुरू करणार आहोत. आपल्याला जर लायसन नसतं मिळालं तर हा कारखाना भंगारात विकावा लागला असता काही लोकांचा तसा डाव होता.आपण सर्व जण मिळुन कारखाना सुरू करणार आहोत.हि वास्तु आपल्याला टिकवून ठेवायची आहे.आपण कारखान्यासाठी मोर्चा काढला यासाठी शेतकरी बांधवांनी उसाच्या आता नवीन २५ जातीचे नवीण वाण आले असून आम्ही लखनऊ वरून ७३१८१ जातीचा नमुना त्या ऊसाची एॅव्हरेज १०० टन प्रती एकर आहे.लखनऊ चे क्लीन कमिशनर यांना विनंती केली आहे. प्रायोगिक तत्त्वावरती रोपे किंवा बेणे देण्याची मागणी केली आहे.मिळून जातील ऊसाची लागवड शेतकरी बांधवांनी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले तालुक्यातील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. कारखाना परिसरात श्रीफळ वाढवून विधिवत पूजन करून नव्या सुरुवातीची घोषणा करण्यात आली.वेदमंत्रांच्या उच्चारात पूजा करण्यात आली आणि कारखाना लवकरच सुरू होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, कारखाना सुरू झाल्यास परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अनेक वर्षांपासून बंद असल्याने परिसराच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. आता नव्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून कारखाना पुन्हा कार्यरत करण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत.

शेतकरी व नागरिकांनीही कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली असून या पूजन सोहळ्यामुळे परिसरात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमास कार्यकारी संचालक व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार बांधव मोठ्या उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.