धानोरा येथील हाजी मुबारक बादशाह यांचे निधन
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील तबलीग चे मान्यवर व्यक्ती हाजी सय्यद मुबारक बादशाह (धानोरावाले) यांचे बुधवारी (दिनांक २५ रोजी ) वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्या निधनाने धानोरा परिसरासह संपूर्ण बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. हाजी सय्यद मुबारक बादशाह हे अत्यंत मनमिळाऊ, सेवाभावी आणि लोकांना जोडून ठेवणारा स्वभाव ही त्यांची ओळख होती. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनिय योगदान होते. त्यांच्या जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, २६ रोजी सकाळी १० वाजता धानोरा येथील त्यांच्या निवास स्थानापासून निघणार आहे व जामा मशीद येथे नमाजे जनाजा अदा करून त्यानंतर दफनविधी पार पडणार आहे.
त्यांच्या पश्चात चार मुली, दोन मुलं, नातू-पणतू असा त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अल्लाह ताआला त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये उच्च मकाम अता करो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.



stay connected