देशमुखांनी सादर केलेल्या 'मंतरलेल्या वाड्यात..' प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध.
अहिल्यानगर :-- राज्यस्तरीय ४थे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, निमगाव वाघा येथे ,परिवार कार्यालयात संपन्न झाले. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सरोजआल्हाट होत्या.तर संमेलनाध्यक्ष पदी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे होते. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा, ऍड राजेश कावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे आयोजक माननीय नानासाहेब डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार, कवी संमेलन, कथाकथन, पोवाडा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. संमेलनात कथालेखक बाळासाहेब देशमुख यांनी 'मंतरलेल्या वाडा' ही कथा सादर केली. गावातल्या टारगेट मुलांनी, कीर्तनकार विसाजी विसपुतेंना गावाच्या बाहेरील इनामदारांचा वाडा कार्यक्रमासाठी सुचविला. गाववाल्यांनी दिलेली माहिती खरी आहे. असे त्यास वाटले. म्हणून ते इनामदाराच्या वाड्यात आले. वाड्यात प्रवेश करताच, सगळीकडे भिंतीवर चिकटलेली कोळ्याची जाळे, वडाची वाळलेली पाने आणि काटक्या खचाखच अंगणात पडलेल्या.तोंडासमोरून उडत जाणारी वटवाघळे, या साऱ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या. आणि मग सुरू झाला एक थरार. जो बाळासाहेबांनी आपली देहबोली ,आवाजातील चढ उतार, आणि अभिनयाचे बारकावे याद्वारे कथा सादर केली. सारे रसिक मंत्रमुग्ध होत, टाळ्यांचा कडकडाट झाला.
विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कथा लेखक बाळासाहेब देशमुख यांना देखील 'स्वामी विवेकानंद साहित्यरत्न' पुरस्काराने ,पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर , संमेलनाध्यक्ष सुभाष सोनवणे, ऍड राजेश कावरे या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब देशमुख यांचे साहित्यिक लेखन सातत्याने सुरू असते त्याचप्रमाणे कथाकथन कार्यक्रमातून, प्रबोधन ,संस्कार यांचे प्रतिबिंब कथेद्वारे सादर करत असतात.
याप्रसंगी कवी संमेलनाध्यक्ष आत्माराम शेवाळे, दिलीप कापसे, रूपचंद शिदोरे, बाळासाहेब मुतोंडे, शिवशाहीर शिवाजी थिटे, संदीप रासकर, रामदास कोतकर इत्यादी ज्येष्ठ साहित्यिक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले.


stay connected