शासनाच्या दिरंगाईमुळे गरीब लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न भंगले
लोहा:- तालुका प्रतिनिधी , चंद्रकांत वाघमारे
लोहा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तब्बल ११८ ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रधानमंत्री आवास, रमाबाई आवास योजना घरकुल योजनेत मोठा हाहाकार माजला आहे. याचे कारण "स्पर्श प्रणाली" कि अधिकारी, कर्मचारी, आसा संभ्रम लाभार्थी मध्ये निर्माण झाला आहे.
गेले अनेक महिन्यांपासून हजारो घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर निधीच उपलब्ध झालेला नाही. शासनाच्या या दिरंगाईमुळे गरीब लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न भंगले असून, त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
घरकुल लाभार्थ्यांना 'स्पर्श' प्रणालीमुळे तांत्रीक अडचणी येत आहेत, ज्यामुळे त्यांना अनुदानाचे हप्ते वेळेवर मिळत नाहीत, परिणामी घरकूलांची कामे रखडली आहेत; यावर उपाय म्हणून शासनाचे त्वरित लक्ष देऊन हप्ते सुरळीत चालू करणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी पहिलाच हप्ता मिळत नसल्याने तर घर पुर्ण होऊन देखील तिसरा व चौथा हप्ता मिळाला नसल्याने लाभार्थी संकटात सापडले असल्याचे,असे दिसून येत आहे
मुख्य अडचणी
तांत्रिक समस्या 'स्पर्श' प्रणालीत तांत्रिक बिघाडामुळे लाभार्थी निधिपासून वंचित आहेत, वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे ऊत्तरे ऐकुन लाभार्थी व घरकुल विभागातील कर्मचारी, कधीकारी यांच्यात तुतू आरे वारे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, बरेचदा पंचायत समिती ते पोलिस स्टेशन पर्यंत तक्रारी पोहचल्या आहेत, स्थानिक पातळीवर घरकुल विभागातील कर्मचारी, तांत्रिक अभियंता यांना एक मोठे आव्हान झाले आहे,तर प्रत्येक लाभार्थी पंचायत समिती कर्मचारी यांना दोष देऊन,खालच्या स्तरावर बोलताना दिसत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधायला निघालेल्या अनेक लाभार्थ्यांची स्थिती अत्यंत गंभीर तर हालाखीची आहे. बरेच लाभार्थींना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली तर काही लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता मिळाला तर काहींनी कर्ज काढून उसनवारी करून बांधकामाला सुरुवात केली. मात्र पुढील हप्ता थांबल्यामुळे आता त्यांची अवस्था "इकडे आड तिकडे विहीर " अशी झाली आहे.
लाभार्थी यांना पहिला हप्ता मिळाला तेव्हा मला घर मिळाले म्हणून खुप आनंद झाला. पाहुणे रावळे,तर कुणी सावकारी उसनवारी करून तर काहीनी आणेक फाईनंस कंपनी कडून आणि बँकेतून कर्ज काढून पाया भरला. दोन महिन्यांपासून नुसती पंचायत समितीचे उंबरठे झिजवत आहे पण अधिकारी निधी आला नाही ,तर आता सध्या स्थित तांत्रिक अडचणी येत आहेत हेच उत्तर देताना दिसत आहेत. आता बांधलेले घर अर्धवट पडले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत. उसनवारीने दिलेले लोक रोज पैसे मागत आहेत. शासनाच्या योजनेत अडकल्यामुळे लाभार्थीचे जगणं कठीण झाले आहे.तर घर मिळाल्याच्या आनंदात विरजण पडले सारखे झाल्याचे चित्र दिसून येत आहे
लोहा पंचायत समिती हद्दीतील ११८ ग्राम पंचायतींमधील हजारो लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी घरकुल बांधकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. नवीन घरात जाण्याचे स्वप्न पाहनार्या लाभार्थ्यांवर आता दुसर्याच्या घरात किंवा अर्धवट घरात राहण्याची वेळ आली आहे. हप्त्याची रक्कम लवकरात लवकर मिळेल या आशेवर खाजगी फाईनंस, सावकारांकडून किंवा नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज आता डोक्यावर वाढत आहे.नव्या घरात रहाण्याचे स्वप्न पाहणारे तेच डोळे,आत्ता पाणावले असुन व्याज कसे परत करावे असे चित्र दिसत आहे
लाभार्थींचा "वाली" कोण? आसा सवाल लाभार्थी मध्ये निर्माण झाला आहे. या गंभीर स्थितीवर लोहा पंचायत समिती, प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कधी लक्ष देणार? दोन ते तीन महिने पासून निधी का उपलब्ध झाला नाही? किंवा निधी उपलब्ध असेल तर यामागे नेमकी कोणती प्रशासकीय अडचण आहे? घर बांधूनही घरात राहता येत नसलेल्या हजारो गरीब लाभार्थ्यांच्या हालअपेष्टांना जबाबदार कोण, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अडकलेला निधी तात्काळ वर्ग करावा, अन्यथा या पायपिट पायमल्ली मुळे व कर्मचारी अधिकारी यांचे ऊतरे ऐकून सरकारी योजनेचे घर नकोरे "बाबा" आसे म्हणन्याची वेळ आली असल्याने अनेकांचे घरकुलाचे स्वप्न भंग झाल्याची पाळी येणार आहे.



stay connected