जिल्ह्यातील लेखक, कवींना चित्रपट मालिकांमधून लेखनाची संधी मिळणे आवश्यक* : सचिनभाऊ जगताप *आयुर्वेद महाविद्यालयात जिल्हास्तरीय काव्यसंमेलन संपन्न*

 *जिल्ह्यातील लेखक, कवींना चित्रपट मालिकांमधून लेखनाची संधी मिळणे आवश्यक* : सचिनभाऊ जगताप
*आयुर्वेद महाविद्यालयात जिल्हास्तरीय काव्यसंमेलन संपन्न* 




अहिल्यानगर (प्रतिनिधी): *अहिल्यानगर जिल्ह्यातील लेखक कवींना चित्रपट, मालिका आणि मराठी चंदेरी दुनियातील संधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याच्या मध्ये कला आहे, त्याला निश्चितच या क्षेत्रात नाव मिळेल,* असे प्रतिपादन आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिनभाऊ जगताप यांनी केले. 

         आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचलित वैद्य पं.गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अरुणोदय चारिटेबल ट्रस्ट व शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय काव्यसंमेलन व आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर संचालक ज्ञानदेव पांडुळे,संचालिका सौ.वैशाली ससे, प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे, शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी, सुभाष सोनवणे, ज्येष्ठ कवी वसंत मुरदारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना सचिनभाऊ जगताप म्हणाले की, " दोन वर्षांपूर्वी शब्दगंध चे साहित्य संमेलन आ.संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये घेण्यात आले होते, तेव्हापासून या नवीन लिहिणाऱ्यांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे, त्या दृष्टिकोनातून उपस्थित सर्व साहित्यिकांची आरोग्य तपासणी करून प्रज्ञावंत कवींच्या कवितांना चाली लावून योग्य त्या ठिकाणी त्या पोहोचतील,यासाठी प्रयत्न करण्यात येतील". 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी केले. ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

कविवर्य वसंत मुरदारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले. या काव्यसंमेलनात  स्वाती झेंडे, शिरीष जाधव, पी.एन. डफळ, एम.पी. दिवान,कार्तिक झेंडे,रूपचंद शिदोरे,शरद धलपे,स्वाती अहिरे,आशा साठे, प्रबोधिनी पठाडे,बाळासाहेब कोठुळे, शाहिर वसंत डंबाळे,आत्माराम शेवाळे,प्रशांत सूर्यवंशी, बाळासाहेब देशमुख,रामदास कोतकर,विनय पिंपरकर,समृद्धी सुर्वे,ज्ञानदेव उंडे,वसंत बडे,उज्वला वासल,सुरेखा घोलप,विशाल कर्डिले,ॲड.अशोक गायकवाड,ॲड.बबन सुबे, रिया चौधरी, सुमेध चव्हाण,बाळासाहेब मुंतोडे, दिलीप कापसे, देवकी ढोकणे,मनीषा जगताप, शामा मंडलिक,क्रांती करंजगीकर,वर्षा भोईटे,जयश्री झरेकर, डॉ.संगीता कदम, डॉ.तारकेश्वर वानखेडे यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र फंड,प्रशांत सूर्यवंशी,बबनराव गिरी, शर्मिला रणधीर,वृषाली राऊत, प्रा.डॉ. अनिल गर्जे,प्रा.डॉ.अमित शिनगारे,डॉ.रुपाली म्हसे, डॉ. जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमास मुख्याध्यापक शिवाजी लंके, डॉ.एन.जी ठाकरे, डॉ.ऐ. एस. वानखडे, डॉ.प्रवीण जोशी, डॉ. एन.जी. बकाल, अरुण साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.