*२१ युनिट ३ साखर कारखाना शिवणी (जा.) परिसरातिल नागरीक प्रदुषणाच्या विळख्यात*...
लोहा:-चंद्रकांत वाघमारे
शिवणी (जा.) येथील परिसरात प्रदूषणाचा धोका वाढला. नागरिक अनेक आजाराने त्रस्त तर रासायनिक द्रव्ये मिश्रित पाणी पिल्याने अनेक जनावरे मृत्युमुखी
तालुका लोहा येथील शिवणी जा.परीसरात सध्या उसाच्या हंगामामुळे वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्या रस्त्यावर काजळी व नदि नाल्यात रासायनिक द्रव्ये मिश्रित पाणी पसरत आहे. एकंदरीतच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत असताना या धुळीमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
२१युनिट३ साखर कारखाना शिवणी या कारखान्याच्या बॉयलरमधून चिमणी द्वारे पांढरे काळे धूलीकण हवेमध्ये पसरत आहेत. संपूर्ण परिसरात या धूलीकणांचे साम्राज्य माजले आहे. घराघरात घराच्या छतावर गाड्यांचे टपावर दुकानात या कणांचा राक्षसी साम्राज्य पसरत चालला आहे. नागरिकांच्या नाकातोंडात डोळ्यात अडकणार्या काळ्या-पांढर्या काजळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सततच्या हवेमध्ये उडणार्या काजळीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
नागरिकांना रस्त्या रस्त्यातून वाहने चालवताना डोळ्यांमध्ये अचानकपणे येणार्या काजळीचा मोठा धोका संभवतो आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही सामान्य नागरिकांना याचा खूप त्रास होत असताना याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. यामुळे घराघरात सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून तेथील डॉक्टरांना रुग्णांना सेवा देताना नाकीनऊ येत आहे.
शिवणी जा. येथिल व परीसरातील लोकसंख्या विचारात घेता दवाखाने ही कमी पडू लागले आहेत. त्यामुळे सध्या येथील डॉक्टर व मेडिकल दुकानांची या प्रदूषणामुळे चलती असल्याची चर्चा आहे. परंतू सामान्य नागरिकांना शारीरिक व आर्थिक ताण सहन करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही, असे असताना प्रदूषण नियंत्रण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
शिवणी परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे रात्रंदिवस अक्षरशः लोकांना घराची दारे लावून बसावे लागत आहे. शेतात काम करणार्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांचा संपूर्ण अवतारच बदलला जात असून मजूर वर्गाला काम करताना पिकावरील पडलेल्या काजळीचा मोठा धोका संभवत पिकावरील पडणार्या काजळीमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांच्या पानांमधून होणारे प्रकाश संशोलनाचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे याचा परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होत आहे.कापुस,हरभरा, ज्वारी, सर्व पिके वाढ खुटल्याने परीसरातील बरेच शेतकरी यांचेवर ना पिकि करणे ऊपासमारीची वेळ आली आहे
गावांमध्ये वाढलेले प्रदूषण यामुळे येथील परिसरातील नागरिक शारीरिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चालले आहे. या वाढत्या प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट होत चालला आहे. नागरिक मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. शिवाय अशी परिस्थिती राहिल्यास भविष्यात नागरिकांना २१ युनिट-३ शुगर कारखान्याचा परिसर सोडून जावे लागणार यात शंका नाही. तरी प्रदूषण नियंत्रण विभागाने याचा लवकरात-लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व
मौजे जामगा शिवणी ता.लोहा.येथील शेतकरी
राहुल एडके,देवराव संभाजी सोनवणे ,
लक्ष्मण केरबा दुधमल ,विठ्ठल केरबा दुधमल यांनी संमंधीत साखर कारखाना व
प्रदूषण नियंत्रण विभागाकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे त्यावर संमंधीत विभाग काय कार्यवाही करेल याकडे परीसरातील शेतकरी यांचे लक्ष लागले आहे
*प्रदूषणाचे कारण:*
- २१ युनिट-३ साखर कारखान्याच्या बॉयलरमधून चिमणी द्वारे पांढरे काळे धूलीकण हवेमध्ये पसरत आहेत.
- रस्त्या रस्त्यातून वाहने चालवताना डोळ्यांमध्ये अचानकपणे येणार्या काजळीचा मोठा धोका संभवतो आहे.
*प्रदूषणाचे परिणाम:*
- नागरिकांना सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
- शेतात काम करणार्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत.
- पिकांच्या पानांमधून होणारे प्रकाश संशलनाचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे याचा परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होत आहे.
*मागणी:*
- प्रदूषण नियंत्रण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- संबंधीत साखर कारखाना व प्रदूषण नियंत्रण विभागाने लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे त्यावर संमंधीत विभाग काय कार्यवाही करेल याकडे परीसरातील शेतकरी यांचे लक्ष लागले आहे.
*शेतकऱ्यांची समस्या:*
- कापुस, हरभरा, ज्वारी, सर्व पिके वाढ खुटल्याने परीसरातील बरेच शेतकरी यांचेवर ना पिकि करणे ऊपासमारीची वेळ आली आहे.
- गावांमध्ये वाढलेले प्रदूषण यामुळे येथील परिसरातील नागरिक शारीरिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चालले आहे.




stay connected