*रविवारी शब्दगंधची महत्वपूर्ण बैठक*
अहिल्यानगर (प्रतिनिधी):
*शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता कोहिनूर मंगल कार्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे.* अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंधाच्या होणाऱ्या या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून शाखा विस्तार बाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक पुरस्कारासाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा करिता परीक्षक निश्चित करण्यात येणार असून राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजना बाबत चर्चा होणार आहे. तसेच राज्य कार्यकारणी सदस्य स्व.अरुण आहेर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कार्यकारणी सदस्य जागेवर नवीन सदस्य निवड करण्यात येणार आहे. दर तीन वर्षातून होणारी शब्दगंध च्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ सभासदाची निवड करण्यात येणार आहे. सोळाव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर यांचे अभिनंदन करण्यात येणार असून मा.अध्यक्षांच्या संमतीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.
तरी सर्व साहित्यिक, साहित्य रसिक, शब्दगंधचे सभासद यांनी सदर बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.


stay connected