आ. सुरेश धस यांच्या प्रभावी पाठपुराव्याने ११ उपकेंद्रांमध्ये नवीन पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर

 मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी २.० अंतर्गत आष्टी–पाटोदा–शिरूर तालुक्यांना मोठा दिलासा

****************************

आ. सुरेश धस यांच्या प्रभावी पाठपुराव्याने ११ उपकेंद्रांमध्ये नवीन पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर

******************************



*******************************

आष्टी (प्रतिनिधी)

 मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी २.० या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यांमधील कृषी वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, या तीनही तालुक्यांतील एकूण ११ वीज उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० व ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन ऍडिशनल पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत.

     ही सर्व मंजुरी आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रशासनाशी केलेल्या समन्वयपूर्ण चर्चा व शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने मांडल्यामुळे शक्य झाली आहे. कृषी वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी, वाढता भार व अपुरा ट्रान्सफॉर्मर क्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन आमदार धस यांनी हा विषय प्राधान्याने शासनदरबारी लावून धरला होता.

    या निर्णयानुसार पुढील उपकेंद्रांमध्ये १० एम.व्ही.ए क्षमतेचे नवीन या ऍडिशनल पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले ३३/११ के.व्ही. उपकेंद्र, आष्टी,३३/११ के.व्ही. उपकेंद्र,धानोरा  येथे तर ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन ऍडिशनल पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत.३३/११ के.व्ही. उपकेंद्र, सावरगाव,३३/११ के.व्ही. उपकेंद्र, जळगाव (कडा कारखाना),३३/११ के.व्ही. उपकेंद्र, डोईठाण,३३/११ के.व्ही. उपकेंद्र, कुसळंब,३३/११ के.व्ही. उपकेंद्र, लांबरवाडी,३३/११ के.व्ही. उपकेंद्र, कोतन,३३/११ के.व्ही. उपकेंद्र, दासखेड,३३/११ के.व्ही. उपकेंद्र,घाटशीळ पारगाव३३/११ के.व्ही. उपकेंद्र, भायाळ या नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे कृषी पंपांना स्थिर वीजपुरवठा, भार नियंत्रण, कमी व्होल्टेजची समस्या दूर होणे तसेच शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत अधिक दर्जेदार वीज मिळण्यास मोठी मदत होणार आहे.परिणामी शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

आमदार सुरेश धस यांनी नेहमीच शेतकरी, कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांना अग्रक्रम दिला असून, त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे व ठाम पाठपुराव्यामुळेच ही महत्त्वाची कामे मंजूर झाल्याची भावना परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये व्यक्त करून राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व आ.सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.