जुनेद शेख BDS परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
आष्टी: जुनेद बाबासाहेब शेख याने आपल्या कष्टाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. जुनेदने 'बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी' (BDS) ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मिळवली आहे.
जुनेदने आपले उच्च माध्यमिक शिक्षण आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयात पूर्ण केले होते.
त्यानंतर त्याने प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या लोणी येथील दंत महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्याच्या या यशाने आष्टी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.संस्थेचे अध्यक्ष माननीय किशोर हंबर्डे यांनी जुनेद चे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी प्रा. सय्यद अलाउद्दीन हे जुनेदचे काका आहेत. जुनेदच्या या यशाबद्दल त्याचे, वडील बाबासाहेब शेख आणि संपूर्ण शेख परिवाराचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्याच्या या यशाबद्दल मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.


stay connected