रहेमान सय्यद यांना दै.अल्हिलाल समूहाचे नजाबत अली उस्मानी आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर
कडा (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील एकमेव उर्दू दैनिक अल्हिलाल टाइम्स यांनी उर्दू वर्तमानपत्रासह मराठी वर्तमानपत्र दैनिक संघर्ष नावाने सुरू करून उर्दू दैनिकाचे समूह घडून आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या वतीने गेल्या १८ वर्षांची परंपरा कायम ठेवत १९ व्या वर्षात हि भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले असून ३१ डिसेंबर २०२६ रोजी भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड येथील नामवंत शिक्षक समाजसेवक उर्दू प्रेमी नजाबत अली उस्मानी यांच्या नावाने दरवर्षी आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान करण्यात येते. यंदाच्या या पुरस्कारासाठी आष्टी तालुक्यातील कडा येथील धडाडीचे समाजसेवक रहेमान सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. कडा येथील रहिवाशी रहेमान सय्यद हे सामाजिक कार्यासह पत्रकारिता क्षेत्रात हि अग्रेसर असुन तालुक्यातील रूग्ण असो कि गोरगरीब त्यांच्या सेवेत ते नेहमी दिसून येतात पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रकरणाचे वाचा फोडणारे रहेमान सय्यद यांनी गोरगरिबांना योजनेत सहकार्य करणे,मतदार यादीत नावे नोंदणी करणे अशी अनेक समाजोपयोगी कार्य करत अन्याया विरोधात कायम आंदोलने उपोषणांसह लेखनीतून आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत त्यांना दै.अल्हिलाल समूहाच्या वतीने येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना नजाबत अली उस्मानी आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रहेमान सय्यद यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


stay connected