▪️लोहा उपनगराध्यक्षपदी मुजावर करीम यांची बिनविरोध निवड
▪️लोह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजास प्रतिनिधित्व
लोहा:-चंद्रकांत वाघमारे
बहुचर्चित व वादळी ठरलेल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह २० पैकी १७ जागा निवडून आणत लोहा नगर परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळविले. यापूर्वीच गटनेते पदाची निवड करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी दि. ९ रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली त्यात मुजावर करीम यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. पालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत मुस्लिम समाजास उपनगराध्यक्ष पदावर सन्मान देण्यात आला नव्हता. मागील पाच वर्षात उपाध्यक्ष पदाची संधी आली मात्र सदर संधी थोडक्यात हुकल्याने मुस्लिम समाजात नाराजीचा सूर होता. करीम मुजावर यांच्या रूपाने मुस्लिम समाजास रतिनिधीत्व मिळाल्याने मुस्लिम समुदायतुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे २० पैकी १७ नगरसेवक निवडून आले आहेत. नवनिर्वाचीत नगराध्यक्ष शरद पवार यांचा पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड झाल्याने करीम मुजावर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व करीम मुजावर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या कडे केवळ मुजावर करीम यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरीध निवड करण्यात आली. यावेळी माजी जि. प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, चिखलीचे माजी सरपंच सचिन पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, गटनेता भास्कर पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले सह बहु नगरसेवक कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लोहा पालिका अस्तित्वात आल्यापासून तब्बल ३८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर एका मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीस उपनगराध्यक्ष पदाची संधी प्राप्त झाल्याने सर्व स्तरातून आ. चिखलीकर यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.


stay connected