राज्यस्तरीय ४ थे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात.. श्री बाळासाहेब देशमुख "कथाकथन" साठी निमंत्रित

 *राज्यस्तरीय ४ थे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात.. श्री बाळासाहेब देशमुख "कथाकथन" साठी निमंत्रित*



अहिल्यानगर :- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय चौथे मराठी साहित्य संमेलन निमगाव वाघा येथे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत आहे.

सदर साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, कवी संमेलन ,पुरस्कार विजेत्यांचा सन्मान असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

सदर संमेलन मध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना कथाकथन कार्यक्रम साठी, कार्यक्रम प्रमुख पै. नानासाहेब डोंगरे यांनी निमंत्रित केले आहे. याप्रसंगी ते 'मानवतेचा धर्म' हा प्रयोग कथाकथन मध्ये सादर करणार आहेत.

बाळासाहेब देशमुख यांचे आजवर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ४५० प्रयोग शाळा, कॉलेज, सभागृह, ज्येष्ठ नागरिक संघ, इत्यादी ठिकाणी संपन्न झालेली असून, राज्यस्तरावरील महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलन मध्ये वीस प्रयोग पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या 'रंग माझा वेगळा'  या कथासंग्रहाचे प्रकाशन लवकरच होत आहे..

सदर संमेलन, परिवार कार्यालय , निमगाव वाघा , अहिल्यानगर येथे होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.