अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ऊसतोड मजुराच्या कुटुंबाला धस कुटुंबीयांचा आधार जयदत्त धस यांच्याकडून एक लाख रुपयांची एफडी सुपूर्द

 अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ऊसतोड मजुराच्या कुटुंबाला धस कुटुंबीयांचा आधार
जयदत्त धस यांच्याकडून एक लाख रुपयांची एफडी सुपूर्द



आष्टी (प्रतिनिधी)


कारखाना साईडवर झालेल्या अपघातात दुःखद निधन झालेल्या ऊसतोड मजूर व रिल स्टार म्हणून ओळखले जाणारे गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना लोकनेते आ.सुरेश धस यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.

आज डोंगरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. या वेळी कुटुंबाच्या आधारासाठी एक लाख रुपयांची एफडी मदत स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. ही एफडी जयदत्त भैया धस यांच्या हस्ते देण्यात आली.

या प्रसंगी मा. सरपंच हरी पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. अचानक आधार गमावलेल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत, “या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” अशा भावना लोकनेते सुरेश धस यांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.