विवेक जाॅन्सन यांचा जनता दरबार शेतकऱ्यांसाठी कूचकामी - शेतकरी संघटना
प्रजासत्ताक दिनानिमित्त तरी वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळेल का?
कडा (प्रतिनिधी) ९जानेवारी२०२६रोजी मा.जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांचा जनता दरबार आष्टी तहसील कार्यालयात होणार म्हणून भरपूर प्रसिद्धी करून आयोजित केला होता. जनता दरबार मध्ये शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनूदान अद्याप मिळालेले नाही. तसेच रब्बी हंगामातील कांदा अनुदान मिळाले नाही.अशा शेतकऱ्यांनी जनता दरबारात लेखी स्वरूपात अर्ज सादर केले होते आष्टी तालुक्यातील तीस टक्के शेतकरी अनूदानापासून वंचीत आहेत. फार्मर आयडी,आधार अपडेट, मोबाईल नंबर अपडेट हे सगळे असूनही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनूदान अद्याप मिळालेले नाही. याबाबत जनता दरबार दरम्यान मा.जिल्हाधिकारी यांनी आष्टी तहसीलदार यांना सूचना दिल्या होत्या.आजही तलाठी यांना विचारले असता अनूदान कधी येईल? ते सांगता येत नाही असे उत्तर दिले जाते. मयत शेतकऱ्यांनाही वगळण्यात आले वारसदार म्हणून वारसाला यादीत घेणे आवश्यक होते. जनता दरबाराला पंधरा दिवस उलटले तरी अद्याप अनूदान मिळाले नाही. मागेल त्याला सोलर सर्वेसाठी वायरमन पैसे घेतात तसेच सोलर बसवण्यासाठी खड्डा शेतकऱ्यांना खणावा लागतो ,खडी वाळू सिमेंट शेतकऱ्यांना द्यावी लागते वर परत दक्षिणा ही मागितली जाते ही वस्तूस्थीती
आहे. शेतकरी तक्रार करण्यासाठी धजावत नाही कारण त्यांना नंतर वेठीस धरले जाते एखादा शेतकरी जर तक्रार घेऊन गेला तर तक्रारींची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांना कामधंदा सोडून बीड अथवा आष्टी येथे हेलपाटे मारायला वेळ व पैसा नसतो वेळ जरी काढली तरी तक्रार करूनही काही निष्पन्न होत नाही.कारण प्रत्येक गावात त्यांचे हस्तक आहेत व कूणातरी राजकीय नेत्यांच्या तो कार्यकर्ता असतोच. बाजारसमीतीमध्ये शेतमालाला आधार भूत किंमत मिळत नाही. जिल्हा उपनिबंधक यांचेकडे तक्रार करूनही काही निष्पन्न झाले नाही. नाॅनएफ एक्यू च्या नावाखाली शेतमाल खरेदी केला जातो एफएक्यू व नाॅनएफ एक्यू ठरवण्यासाठी कुठलीही यंत्रणा बाजार समिती मध्ये नाही.कडता कापला जातो (क्विंटल मागे २किलो.)तसेच बाजार समितीत बारदाना रक्कम अथवा बारदाना परत दिला जात नाही तो सहकार कायद्या प्रमाणे देणे गरजेचे आहे. यूरिया तर दरवर्षी प्रमाणे जादा दराने विक्री केला जातो.याबाबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मा.जिल्हाधिकारी यांना बीड येथे जनता दरबारात भेटण्यासाठी गेले असता मा.जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिक लेखी स्वरूपात अर्ज सादर करा मी कार्यवाही करतो सांगितले होते . शेतकऱ्यांना शंभर किलोमीटर अंतरावर जाऊन तक्रार करणे शक्य होत नाही.व तहसील कार्यालयात देखील तक्रार करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या बॅक खात्याला होल्ड आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांच्या त्रास.कर्जवसूलीस राज्य सरकारने ९आक्टोंबर २०२५रोजी स्थगीती दिली आहे तरीही बॅंकेचे वसूली अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी येत आहेत. वरील सर्व परिस्थिती पहाता मा.जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांचा जनता दरबार शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरत आहे. खरेच ही प्रजेची सत्ता आहे का? शेतकऱ्यांसाठी कसला प्रजासत्ताक दिन रोज ऊठ मरमर काम कर वर सगळे लूटण्यासाठी बसले आहेत.
अतिवृष्टी अनूदान व कांदा अनुदान वंचित शेतकऱ्यांना मिळणार कि तसेच जाणार याबाबत साशंकता आहे . कारण सर्वच शेतकरी तक्रार करू शकणार नाहीत. जाण्यायेण्याच्या खर्चातच अनूदान रक्कम खर्च होईल . जवळपास सगळेच अल्पभूधारक शेतकरी आहेत .
मा.जिल्हाधिकारी यांनी किमान प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तरी वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा . अतिवृष्टी अनूदान, कांदा अनुदान,मागेल त्याला सोलर व बाजार समितीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी केली आहे .



stay connected