एमआयएम चे टार्गेट जिल्हा परिषद व पंचायत समिती
राज्यात व जिल्ह्यात उमेदवार देणार - डॉ परवेज अशरफी
नगर - नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या नगर पालिका, नगर परिषद, महानगर पालिकेत एम आय एम पक्षाला चांगले यश मिळाले असल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मनोबल वाढलेला आहे.
नांदेड महानगर पालिकेतून महाराष्ट्रात प्रवेश करणारी एम आय एम ने राज्यातील अनेक नगर पालिका महानगर पालिकेत आपले दमदार प्रवेश केले आहे.
हैदराबादचा पक्ष बोलता बोलता आज मुस्लिम समाजच नव्हे तर इतर हिंदू, दलीत समाजही एम आय एम पक्षा सोबत जोडले गेले आहे. एम आय एम पक्षानं निवडणुकीत मुस्लिम व्यतिरिक पण इतर समाजाचे उमेदवार निवडणुक्ती उतरवले आणि जिंकून आणले.
यावरून हे स्पष्ट दिसते की एम आय एम हा हैदराबादचा पक्ष राहिलेला नाही पक्षाला सर्व समाजाचे लोक पसंत करत असून निवडणूक लढवण्याची तयारी देखील दाखवत आहे.
महाराष्ट्रात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली.व नगर पालिकेत ८३ नगरसेवक १ नगर अध्यक्ष निवडुन आले. तर महानगर पालिकेत १२५ पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले. सध्याची आकडेवारी पाहता एम आय एम या पक्षाची कामगिरी महाराष्ट्रातील अनेक सत्ता भोगलेले पक्षा पेक्षा उत्तम असल्याचे दिसते. काही महानगर पालिकेत एम आय एम २ नंबरचा पक्ष झालेला आहे .त्यात औरंगाबाद , मालेगाव, नांदेड महानगर पालिकेचा समावेश आहे.
प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपला मोर्चा आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे वळविलेला असून राज्यातील प्रत्यक जिल्ह्यात समन्वयक यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत उमेदवार उभे करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नगर महानगर पालिका पहिल्यांदाच एम आय एम पक्षाने जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली असून पक्षाचे २ नगरसेवक निवडून आले.तर २ उमेदवारांचा अवघ्या थोडया मताने पराभव झाला.
ज्या प्रकारे नगर महानगर पालिकेची निवडणूक झाली त्यात शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, मनसे, वंचित पेक्षा चांगली कामगिरी एम आय एम ने केली.
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पक्ष आपले नशीब आजमावणार असल्याने राज्य व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पक्ष उमेदवार देणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात नव्हे तर देशात एम आय एम पक्षाला वाढती पसंती मुळे धर्मनिरपेक्ष पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.असेही नमुद केले.
आपला
डॉ परवेज अशरफी 9890006580


stay connected