लोहा तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री व मटका जुगार चालू,अभय कोणाचे..?? नागरीकात चर्चा..!!!

 लोहा तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री व मटका जुगार  चालू,अभय कोणाचे..??
नागरीकात चर्चा..!!!




लोहा  प्रतिनिधी:-चंद्रकांत वाघमारे 


आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही लोहा तालुक्यात व परीसरात सर्रास अवैध गुटखा विक्री व मटका जुगार सर्रासपणे सुरू  आहे. परंतु, त्यावरही प्रशासनाने कळस गाठला आहे.म्हणजेच सध्या गुटखा विक्रेत्या कंपन्यांनी या जीवघेण्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांना लाखोंची बक्षिसे देऊ केली आहे.अशि चर्चा आहे  या मटका,जुगार व गूटखा खुलेआम विक्रीबाबत अन्न औषध व प्रशासनाची ‘नजर’ मेल्याने गुटख्याचे अवैध विक्रेते ‘हतबल’ होऊ शकत नसल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यात राजणिवास,रजनिगंधा,विमल,आर एम डी व इतर होलसेल गुटखा विक्रेते असल्याचे समजते. अन्न व औषध प्रशासन हे आर्थिक हीतसबंधामुळे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.


गुठका विक्री वर कडक करण्यासाठी राज्य सरकारने गुटखा माफियांवर थेट 'मकोका"' अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला असतानाही लोहा शहरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. शाळा-महाविद्यालय, धार्मिक स्थळे व परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या गूटख्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना, अनेक  तरूण व्यसनाधीन आणि मटक्या मुळे आनेकांचे  संसार व जिवण उध्वस्त होत असुन तालुक्यातील अनेक तरूनाणि आत्महत्या केल्याचे  नागरीकातुन आगदि खालच्या स्तरातुन बोलल्याचे दिसून येत आहे  शासन कठोर भूमिका घेत असले तरी स्थानिक पातळीवर कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अवैध गुटख्याची साठवणूक करण्यासाठी ऑटो-रिक्षांचा व मोटार सायकल, स्कुटी चा वापर केला जात असून, अरुंद गल्ल्यां मधील पान टपऱ्या व किरकोळ दुकानदारांना गुटखा पोहोचवण्यासाठी मोटरसायकल व स्कूटीचा आधार घेतला जात आहे. स्कूटीचा पुढील भागात पोते ठेवून तसेच डीक्की मध्ये भरून प्रतिबंधित

गुटखा वितरित केला जात असल्याने हा संपूर्ण व्यवहार अत्यंत नियोजनबद्ध आणि संघटित पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येते. व गल्ली बोळात राजे रोज पणे मटका जुगार आकडे घेतले जातात,छत्रपती शिवाजी महाराज चौक , बस स्थानक गवळी गल्ली जुना लोहा मोंढा कमान हळदव रोड शनिदेव मंदिर परिसर बेरळी फाटा,कंधार रोड गंगाखेड सायाळ रोड,कारेगाव,पार्डी, किरोडा कंधार रोड,आदी प्रमुख भागात ऑटो-रिक्षा व दूचाकीतून पुरवठा, गुटखा माफियांना अभय कोणाचे....?

शासनाने प्रतिबंधित केलेला सितार, गोवा, सागर, विमल, आर एमडी, वजीर, आदत, राजणिवास, रजनीगंधा, मुसाफिर आदी गुटखा सर्रास विकला जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.   लोहा शहरातील विविध  भागात रातोरात पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. गुटखा कोणत्या वाहनातून व किती वाजता येतो, याची माहिती संबंधित यंत्रणांना असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने या व्यवहारा मागे अर्थपूर्ण देवाणघेवाण सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. राज्य सरकार *'मकोका'* सारखा कठोर कायदा लागू करण्याच्या तयारीत असताना लोहा शहरात  मात्र अवैध गुटखा विक्री व मटका बिनधास्त सुरू आहे. त्यामुळे या गुटखा व मटका माफियांना नेमका अभय कोणाचा, कोणत्या राजकीय किंवा प्रभावशाली घटकांचे पाठबळ त्यांना आहे का, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शासनाची कठोर भूमिका प्रत्यक्षात उतरणार का, नाही की लोहा  शहर अवैध गुटखा विक्रीचे व मटका केंद्र म्हणूनच ओळखले जाणार का.. याकडे आता सर्वच तालुक्याचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.